ETV Bharat / state

श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी भिमाशंकराला 'महाअभिषेक'

दरवर्षी श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येने भाविक भिमाशंकरला हजेरी लावतात. मात्र, यंदा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भिमाशंकर मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांविना आज मंदिरात पूजा पार पडली.

mahaabhiesh at Bhimashankar in pune
श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी भिमाशंकरला 'महाअभिषेक'
author img

By

Published : Aug 17, 2020, 12:21 PM IST

Updated : Aug 17, 2020, 12:38 PM IST

पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे चौथ्या सोमवारी मुख्य शिवलिंगाची पहाटे महाआरती करण्यात आली. विविध रंगबेरंगी फुलांनी सजावट करुन शिवलिंगावर महाअभिषेक करण्यात आला. यावेळी नाथपंती महाराजांची उपस्थिती होती.

श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी भिमाशंकराला 'महाअभिषेक'

हर हर महादेव...जंगल महाराज की जय..ओम नम शिवायच्या जयघोषात भिमाशंकर येथे श्रावण मासातील चौथ्या आणि शेवटच्या सोमवार महाआरती करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे अनेक दिवसांपासून भिमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच श्रावण मासात भिमाशंकर परिसर भाविकभक्तांविना ओस पडला होता.

दरवर्षी श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येने भाविक भिमाशंकरला हजेरी लावतात. मात्र, यंदा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भिमाशंकर मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांविना आज मंदिरात पूजा पार पडली. परंपरेनुसार पुजा पाच पूजाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात पूजा संपन्न झाली. सोमवारी पहाटेच्या सुमारास शिवलिंगाला विविध रंगांच्या फुलांनी सजविण्यात आले होते. त्यानंतर शिवलिंगावर महाअभिषेक करण्यात आला. मंदिर श्रावण महिन्यात बंद असल्यामुळे परिसरातील सर्व दुकाने, हार बेल फूल, हॉटेल बंद आहेत. त्यामुळे या भागातील आदिवासी नागरिकांना श्रावण महिन्यात मिळणारा रोजगार या वर्षी मिळाला नसल्याने आदिवासी नागरिकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

Last Updated : Aug 17, 2020, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.