पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून काही ना काही कारणावरून वेगवेगळे मुद्दे तसेच विविध कारणांवरून मोर्चे, आंदोलने, उपोषण, विरोध केलं जात आहे. आत्ता पुण्यात पुन्हा एकदा नव्या वादाला सुरवात होणार आहे. मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील (Malegaon Bomb Blast Case) मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात होणार आहे. (Lt Col Purohit The Man Betrayed) आणि आत्ता या पुस्तक प्रकाशनाला पुण्यातील पुरोगामी विचारांच्या संघटनांनी विरोध केला आहे.
पुरोगामी संघटनेचा विरोध: 2008 सालच्या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावर लेखिका स्मिता मिश्रा यांनी एलटी कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड? हा पुस्तक लिहिलं असून या पुस्तकाचं प्रकाशन येथे 18 डिसेंबर रोजी पुण्यातील एसपी कॉलेज येथे माजी पोलीस कमिशनर जयंत उम्रानीकर, माजी पोलीस अधिकारी सत्यपाल सिंह, माजी पोलीस अधिकारी संजय बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या पुस्तक प्रकाशनाला आत्ता विरोध होत असून एस पी कॉलेज प्रशासनाने या पुस्तक प्रकाशनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी पुरोगामी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी: एलटी कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड? असे शीर्षक असलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाचे पोस्टर आमच्या समोर आले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम 18 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे नियोजित आहे. सोशल मीडिया (Social media) आणि इतर प्लॅटफॉर्मवर पोस्टर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जाते.की, पोस्टरमध्ये असे दिसते की, पुस्तकाचा शुभारंभ कार्यक्रम महाविद्यालयाच्या आवारात, म्हणजे लेडी रमाबाई हॉलमध्ये होणार आहे. एसपी कॉलेज टिळक रोड पुणे येथे आयोजित केला आहे. आम्ही तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो की, कर्नल पुरोहित हे मालेगाव 2008 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत, ज्यात 6 लोक मरण पावले आणि शंभरहून अधिक जखमी झाले. अत्यंत गंभीर प्रकाराचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. आणि इतर कायद्यांतर्गत गंभीर आरोप आहेत.
शैक्षणिक उपक्रमांशी काहीही संबंध नाही: पुस्तक प्रकाशनामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा आणि त्याचा उज्ज्वल ट्रॅक रेकॉर्ड खराब होईल. आम्ही पुढे असे सादर करू इच्छितो की, हे प्रकरण मुंबईतील NIA न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि एसपी कॉलेजमध्ये पुस्तक लाँच करणे अजिबात उचित नाही. ज्याचा शैक्षणिक उपक्रमांशी काहीही संबंध नाही, अशा उपक्रमांसाठी कोणालाही महाविद्यालयाच्या परिसराचा वापर करू देऊ नका. अशा परिस्थितीत, महाविद्यालयाच्या व्यापक हितासाठी पुस्तक प्रकाशनाची परवानगी त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी भीमआर्मी बहुजन एकता मिशनचे अध्याख दत्ता पोळ आणि मूलनिवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी केली आहे. हा पुस्तक प्रकाशित होऊ नये म्हणून मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणातील पिडीत वकील शाहिद नदीम यांनी देखील मागणी केली आहे.अश्या पद्धतीने पुस्तक प्रकाशन करून न्यायालयाचा होणार अवमान होईल अस त्यांनी सांगितल आहे.तर न्यायालयाचा कोणताही अवमान होणार नसल्याचा लेखकाचा दावा पुस्तकाच्या लेखिका स्मिता मिश्रा यांनी केलं आहे.