ETV Bharat / state

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; तत्काळ नुकसान भरपाईची मागणी - पुणे ढगफुटीसदृश पाऊस

परतीच्या पावसाने रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या शेतीसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याची कारवाई सुरू असल्याचे उपविभागीय कृषी आधिकारी मनोज ढगे-पाटील यांनी सांगितले.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

author img

By

Published : Oct 16, 2020, 4:24 PM IST

राजगुरुनगर (पुणे) - पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यांत परतीच्या पावसाने शेतीसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला उशीरा झालेला पाऊस, त्यानंतर बोगस निघालेले बियाणे आणि त्यानंतर धो धो बरसणारा पाऊस आणि त्यामुळे शेतीची झालेली विदारक अवस्था हे या वर्षीच्या हंगामात चित्र आहे. यामुळे 'जगायचं कसं' अशी परिस्थिती झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
दुपारी दोनपासून विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. शेतात काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल ढगफुटी सदृश्य पावसाने डोळ्यासमोर नेस्तनाबूत केला. कांदा, बटाटा, टोमॅटो, भात, भाज्या, फळबागा, पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - चंद्रभागेला १३ वर्षानंतर महापूर; नदीकाठालगत असलेली सुमारे ६ कुटुंबे बाधित

खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात भात पीक, बटाटा, भाजीपाला काढणीच्या तोंडावर आले होते. मात्र, कधी नव्हे अशा पावसाने एका रात्रीत सर्व पिके उद्ध्वस्त केली. त्यामुळे यंदाचा हंगाम पाण्यात गेल्याने सरकारने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.

रब्बी हंगामासाठी कांद्याची रोपे तयार होती. तर, काही भागांत कांदा लागवड झाली होती. मात्र, परतीच्या पावसाने कांद्याची शेतीच पाण्यात गेली. शेताला तलावाचे स्वरुप आले आहे. तर, दुसरीकडे ऊसशेतीचा गळीप हंगाम सुरू होत असताना ऊस शेतीलाही तलावाचे स्वरुप आले आहे. यामध्ये ऊस मुळापासुन सडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
परतीच्या पावसाने रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या शेतीसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याची कारवाई सुरू असल्याचे उपविभागीय कृषी आधिकारी मनोज ढगे-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - खाडीपात्रात जेलिफिशचा शिरकाव; मच्छिमार चिंताग्रस्त, इतर जैवविविधता धोक्यात येण्याची भीती

पुणे जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी -

तालुकाशेतकरीबाधित क्षेत्र (हेक्टर)
भोर1389270.48
वेल्हा 708148
मुळशी 549.80
मावळ1319511
हावेली655250
खेड1493775
आंबेगाव36611393
जुन्नर92253090
शिरुर867666
पुरंदर38001200
बारामती 161605743.50
दौंड47142299.40
इंदापूर55132390

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.