ETV Bharat / state

Pune Crime News: रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा पसरविणाऱ्याला अटक, खोटा कॉल करण्याचे सांगितले धक्कादायक कारण - फोनवरून धमकी

सध्या खोट्या धमक्यांचे फोन येण्याचे सत्र सुरूच आहे. पुणे नियंत्रण कक्षाला रविवारी सायंकाळी दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची फोनवरून धमकी मिळाली होती. ही धमकी खोटी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

Pune Crime News
दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी
author img

By

Published : Jul 18, 2023, 2:20 PM IST

पुणे : लोकांमध्ये घबराट निर्माण होवून पळापळ होवुन चेंगराचेंगरीमध्ये जीवीतहानी व्हावी, या उद्देशाने दादर जंक्शन रेल्वे स्टेशनवरती बॉम्ब आहे, असा फोन पुणे पोलिसांना आला होता. या प्रकरणी धमकीचा खोटा फोन करून अफवा पसरविणाऱ्या तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील 'जयश्री हॉटेल' परिसरातून रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हो फोन आला होता.

दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब : या प्रकरणी पोलिसांनी योगेश शिवाजी ढेरे (रा. गोखलेनगर, विठ्ठल रुक्मीणी मंदीराजवळ जनवाडी, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रशांत सुतार व त्यांचे सहकारी हे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. तेव्हा त्यांना लोणी काळभोर येथील हॉटेल जयश्री या ठिकाणी एक कॉलर थांबला आहे. तो कॉलर सांगत आहे की, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब आहे. तसेच कॉलर हा लोणी काळभोर हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात आहे, अशी माहिती मिळाली होती. लगेच पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली. कॉलरशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा फोन नंबर बंद मिळुन आला.

खोटी माहीती दिल्याचे निष्पन्न : त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल जयश्री येथील कामगारांकडे मोबाईल क्रमांकाबाबत चौकशी केली. तेव्हा तो मोबाईल योगेश ढेरे नावाच्या तरूणाचा असल्याचे समजले. यावेळी योगेश ढेरे याचा शोध घेतला असता तो हॉटेलच्या बाहेर मिळुन आला. त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल मिळून आला. दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोकांमध्ये घबराट निर्माण होवून, जीवीतहानी व्हावी या उद्देशाने पोलिसांना खोटी माहीती दिल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेला पुराव्या अभावी जामीन मंजूर
  2. Bomb Blast Threaten To Mumbai : मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकी, आरोपीच्या उत्तर प्रदेशातून आवळल्या मुसक्या
  3. Mumbai Police Threat Call : मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणणार; मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.