ETV Bharat / state

Lonavala Gang Rape : पर्यटनाला आलेल्या मुलींचं अपहरण करून सामूहिक बलात्कार; दोन आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात - Lonavala crime news

Lonavala Gang Rape : लोणावळामध्ये पर्यटनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Lonavla Gang Rape
Lonavla Gang Rape
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 2:12 PM IST

लोणावळा Lonavala Gang Rape : पर्यटननगरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यात सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका टोळीनं पर्यटनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलींचं अपहरण करून त्यांना डांबून ठेवत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केलाय. या घटनेत लोणावळा पोलिसांनी आतापर्यंत 10 पैकी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी दोघेजण हे विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत. या घटनेमुळं लोणावळा परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेत दोन टोळ्या कार्यरत असल्याचं पोलीस तपासात आढळलं आहे. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

काय घडली नेमकी घटना : अल्पवयीन मुलगी पर्यटनासाठी लोणावळ्यात आली होती. त्यावेळी टोळीकडून तिचं अपहरण करुन तिला डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कारही करण्यात आला. या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच अल्पवयीन मुलीची सुटका करुन कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतलंय. यात दोन विधीसंघर्षग्रस्त बालक, तीन महिला, पाच पुरुष आहेत. यापैकी दोन पुरुषांना पोलिसांनी अटक केलीय. त्याचबरोबर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांना येरवडा येथील बालनिरीक्षण गृह येथे पाठविण्यात आलं आहे. तर इतर सहा जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिलीय.

पीडितेच्या आईनं दिली तक्रार : लोणावळा रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका मुलीचं चाकूचा धाक दाखवत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अपहरण केलं. त्यानंतर आरोपींनी अपहरण करून तिला हनुमान टेकडी परिसरातील एका घरात साखळीनं बांधून ठेवत तिला डांबून ठेवलं होतं. तसंच पीडितेला आरोपींनी मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करत असताना त्यांना त्या ठिकाणी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकेदेखील मिळून आले. बालकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चौकशी केली असता साथीदारांच्या मदतीनं लोणावळा शहर हद्दीच्या बाहेरून अपहरण करून आणल्याची त्यांनी पोलिसांना माहिती दिलीय.

  • आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी : पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना स्थानिक न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपींच्या नावे आधीही काही गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणा अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. Mumbai Gang Rape News: गुंगीचं औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; मुलुंड पोलिसांनी एकाला केली अटक
  2. Nagpur Gang Rape: धक्कादायक! 15 वर्षीय तरुणीवर तब्बल सात नराधमांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार; सर्व आरोपींना अटक
  3. Mumbai Girl Rape Case : आठ वर्षांच्या चिमुकलीवर 53 वर्षाच्या नराधमाचा अत्याचार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.