ETV Bharat / state

कोरोना: चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील लघुउद्योग संकटात... - Ranjangaon and chakan MIDC in pune

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत देशात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण व रांजणगाव औद्योगीक वसाहतीमधील मोठ्या उद्योगांसह लघुउद्योग संकटात सापडले आहेत.

pune
चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील लघुउद्योग संकटात...
author img

By

Published : Apr 16, 2020, 9:40 PM IST

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. याचा परिणाम आता उद्योग व्यवसायांवर होऊ लागला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण व रांजणगाव औद्योगीक वसाहतीमधील मोठ्या उद्योगांसह लघुउद्योग संकटात सापडले आहेत. त्यामुळे पुढील काळात या उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी उद्योजक करत आहेत.

चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील लघुउद्योग संकटात...

पुणे जिल्ह्यातील चाकण व रांजणगाव औद्योगिक वसाहत कमी दिवसांत चांगल्या नावारुपाला आली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत छोट्या-मोठ्या अशा २५० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. तर चाकण औद्योगिक वसाहतीत ३५० पर्यंत छोटे मोठे उद्योग आहेत. यामध्ये जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या या औद्योगिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत. मात्र, नोटबंदी, जीसीटीनंतर या उद्योगनगरीत मंदीचे मोठं सावट उभं राहिले आहे. या संकटातूनही मार्ग काढत लघुउद्योगांनी उभारी घेतली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनचे मोठं संकट या उद्योगांसमोर उभे राहीले आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अदाजे अडीच लाख तर चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये अंदाजे चार लाख राज्य आणि परराज्यातील कामगार आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, लॉकडाऊनमध्ये कंपन्या बंद झाल्याने हा कामगार परतीच्या मार्गावर लागला आहे. त्यातच लघुउद्योगांनी उभारलेल्या लघुउद्योगात बँकांची कर्ज, मोठ्या भांडवलाची गुंतवणूक अशा तिहेरी पेचात लघुउद्योग सापडले आहेत. सध्या बँकांनी कर्जावरील 3 महिने हप्त्यांना सवलत दिली आहे. मात्र, या 3 महिनांचे व्याज कर्जावरील मुद्दल रक्कमेत जमा करुन पुढील काळात हप्ते भरावे लागणार आहेत.

औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मंदीचे सावट उभं आहे. त्यामुळे मोठमोठे उद्योग संकटात असतानाच कोरोनाचे नवीन संकट समोर उभं राहिले आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आणि औद्योगिक वसाहत बंद करण्यात आली. त्यामुळे कामगारांचे नियमीत पगार, कर्जाचे व्याज,असं आर्थिक संकट लघुउद्योगांवर उभं राहिले आहे. त्यामुळे पुढील काळात हिच परिस्थिती कायम राहिली तर हेच लघुउद्योग बंद करण्याची वेळ व्यवसायाीकांवर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पुढील काळात याच उद्योगाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहाण्याची गरज आहे. अन्यथा लघुउद्योग संपुष्टात येण्याची भिती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.