ETV Bharat / state

पुण्यात आजपासून 'लॉकडाऊन' काय राहणार सुरू अन् काय राहणार बंद - lockdown again in pune

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिका प्रशासनाने 13 जुलै ते 23 जुलै पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे. पालिका प्रकाशनाने याबात नियमावली जाहीर केली आहे.

pmc
पुणे महापालिका
author img

By

Published : Jul 13, 2020, 3:40 AM IST

पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिका प्रशासनाने 13 जुलै ते 23 जुलै यादरम्यान पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनच्या या कालावधीत काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

दिनांक 14 जुलै ते 18 जुलै दरम्यान सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी संपूर्णत: बंद राहतील.

त्यानंतर दिनांक 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने सुरु राहतील.

ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवठा सेवा दिनांक 14 जुलैच्या पहाटे 1 वाजल्यापासून ते 23 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहतील.

उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (वंदे भारत योजने अंतर्गत कोविड-19साठी वापरात असलेले वगळुन), रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णतः बंद राहतील.

मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री दिनांक 14 जुलै ते 18 जुलैपर्यंत संपूर्णत: बंद राहतील. त्यानंतर दिनांक 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील.

सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाण मोंढाआडत, भाजी मार्केट, फळे विक्रेते, आठवडी व दैनिक बाजार, फेरीवाले हे सर्व ठिकाणी दिनांक 14 जुलै ते 18 जुलैपर्यंत संपूर्णत: बंद राहतील.

त्यानंतर दिनांक 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत केवळ सर्व अत्यावश्यक किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा आडत भाजी मार्केट, फळे विक्रेते, दैनिक भाजी बाजार या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील.

ई-कॉमर्स सेवा उदा. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट व तत्सम सेवा 14 जुलै ते 18 जुलैपर्यंत संपूर्णत: बंद राहतील. तद्नंतर दिनांक 19 जुलैपासून सर्व ई-कॉमर्स सुरू राहतील.

  • हे राहणार संपूर्णपणे बंद

सर्व केश कर्तनालय, स्पा, ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालय, शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहतील.

सर्व प्रकारच्या खासगी आस्थापना कार्यालये संपूर्णत: बंद राहतील

सार्वजनिक, खासगी क्रिडांगणे, मोकळया जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळी व सायंकाळी फिरण्यासही प्रतिबंधीत राहील.

सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह संपूर्णत: बंद राहतील.

धार्मीक स्थळे व सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णत: बंद राहतील.

  • वाहनांसाठी असणार हे नियम

सार्वजनीक व खासगी प्रवासी वाहने - दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील तथापी, अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्थानक येथे येण्या-जाण्यासाठी व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खासगी वाहन वापरण्यास परवानगी राहील.

  • लग्नकार्यासाठी असतील हे नियम

सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णत: बंद राहतील. मात्र यापूर्वी परवानगी घेतली तर लग्न समारंभ 20 पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये आयोजित करता येतील.

  • बांधकाम व्यवासायिकांसाठी असणार हे नियम

सर्व प्रकारच्या बांधकामची कामे संपूर्णत: बंद राहतील. पण, ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल.

  • यांना असणार सवलत

शहरातील सार्वजनिक व खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादीसाठी संपूर्णत: बंद राहतील. पण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी, पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागांचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक या आदेशातून वगळण्यात येत आहे.

हेही वाचा - जुन्नर येथे वधू-वरासह 35 जण कोरोनाबाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.