पुणे- आळंदी परिसरातील गोलेगाव, पिंपळगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी रसायन दारू भट्टी सुरू होती. या दारूभट्टीला स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यासमवेत उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत उद्धवस्त केले आहे. या कारवाईत २ लाखांची दारू नष्ट करण्यात आली आहे.
गोलेगाव, पिंपळगाव परिसरात अवैध पद्धतीने गावठी दारू बनवली जात होती. त्याबाबत गावातील नागरिक व महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्याकडे पोलीस दुर्लक्ष करत होते. मात्र, आज उत्पादन शुल्क विभागाचे कदम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी व स्थानिक नागरिकांनी गावठी दारूभट्टी उद्धवस्त केली असून यामध्ये रसायनासह २ लाखांची दारू घटनास्थळी नष्ट करण्यात आली आहे. दरम्यान, आळंदी परिसराच्या आजुबाजुला गावठी दारू बनवली जात असताना अनेकांचे संसार उद्धवस्त होतात. त्यामुळे, पुढील काळात अशा दारुभट्टी सुरू होऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी सतर्क रहावे, अशी मागणी महिला ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा- 'कीर्तन करायचं की शेती, हा ज्याचा त्याचा प्रश्न ; मात्र 'त्यांनी' महिलाबाबत अपमानास्पद बोलू नये'