ETV Bharat / state

सैफ अली खानसह शाहरुखचा बंगला कोणाच्या निशाण्यावर? पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात! - SAIF ALI KHAN ATTACKED CASE

अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यातं घेतलं आहे. संशयितानं अभिनेता शाहरुख खानच्या घराचीही रेकी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

saif ali khan attacked case updates
संग्रहित- सैफ अली खान हल्ला प्रकरण, मन्नत बंगला रेकी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2025, 12:16 PM IST

Updated : Jan 17, 2025, 12:38 PM IST

मुंबई -अभिनेता सैफ अली खानवर घरात हल्ला केल्याच्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट आहे. अभिनेत्यावरील हल्ल्याच्या 33 तासानंतर पोलिसांनी संशियाताला ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याचीदेखील संशयितानं रेकी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांच्या २० पथकांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

ताब्यात घेतलेला आरोपीचं हल्लेखोर? आरोपी वांद्रा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीतही कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. आरोपी हा वसई, विरार नालासोपाऱ्याच्या दिशेनं गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयितानंच अभिनेता सैफवर हल्ला केला का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

  • किंग खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न-अभिनेता शाहरुख खान याचा वांद्रे येथील बँड स्टँड येथे मन्नत बंगला आहे. या मन्नत बंगल्यात दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीनं घुसण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शाहरुखच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीनंच सैफ अली खानवर हल्ला केलाय का? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • हल्ल्यानंतर सैफ अली खान जखमी झाल्यामुळे त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी सैफ अली खानच्या शरीरातील काढलेला ब्लेडचा तुकडा पुराव्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सध्या तपासासाठी पोलिसांचे पथक सैफच्या घरी दाखल झालं आहे.

मुंबई पोलिसांकडून कसा तपास सुरू?- गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून तांत्रिक डेटा गोळा केला जात आहे. सैफ राहत असलेल्या 'सतगुरु शरण' इमारतीतील परिसरात किती मोबाईल फोन सक्रिय होते, याचाही तपासात समावेश असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाच्या मदतीनं सैफ अली खानच्या घरातून आणि इमारतीतून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्या पुराव्याच्या आधारे मुंबईतील विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यात आला. पहाटे २.३३ वाजता इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उतरताना संशयिताचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये दिसून आला होता. त्याच्या हातात लाकडी काठी आणि हेक्सा ब्लेड होते. सैफ अली खान व्यतिरिक्त, घरातील ५६ वर्षीय स्टाफ नर्स, तक्रारदार एलियामा फिलिप आणि घरकाम करणाऱ्या नोकराला या घटनेत ब्लेडनं जखमा झाल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार दरोडा टाकण्याच्या उद्देशानं चोरटा अभिनेता सैफच्या घरात घुसला होता.

हेही वाचा-

  1. "तुमचं आमच्यावरील सततचं निरीक्षण आणि देखरेख आम्हाला...", पती सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीनाची पोस्ट
  2. सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरण: आरोपीनं केली एक कोटींची मागणी, मोलकरणीच्या जबाबात उघड
  3. सरकार अन् कायदा, सुव्यवस्था मजबूत; देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून, किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Last Updated : Jan 17, 2025, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.