मुंबई- कंगना रणौतचा वादग्रस्त 'इमर्जन्सी' हा राजकीय चित्रपट आज १७ जानेवारी रोजी विरोध होत असताना प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पंजाबमध्ये सर्वाधिक विरोध होत आहे. 'इमर्जन्सी'मध्ये दाखवलेल्या काही दृश्यांवर शीख समुदायानं आक्षेप घेतल्यामुळं हा चित्रपट वादात भोवऱ्यात सापडला आणि चर्चेत राहिला आहे. पंजाबची राजधानी अमृतसरमध्ये, 'इमर्जन्सी'च्या प्रदर्शनानिमित्त कोणताही वाद टाळण्यासाठी, प्रशासनानं थिएटरबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 'इमर्जन्सी' बद्दल लोकांचे काय मत आहे आणि X वर त्याला कसा प्रतिसाद मिळत आहे हे जाणून घ्या.
I wasn’t expecting Emergency to hit me so hard! Kangana Ranaut nails the role of Indira Gandhi with such raw honesty, and the whole cast brings their A-game. The visuals are stunning, the story captures the intensity of the 1975 incident, and the music perfectly complements the… pic.twitter.com/udAAkWUEqe
— Ramesh Bala (@rameshlaus) January 17, 2025
सर्वात पहिल्यांदा ज्या लोकांना 'इमर्जन्सी' हा चित्रपट कसा आवडला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी 'इमर्जन्सी' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. रमेश बाला यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, " 'इमर्जन्सी' चित्रपटाचा माझ्यावर परिणाम होईल अशी मला अपेक्षा नव्हती, कंगनानं श्रीमती इंदिरा गांधींची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे. चित्रपटातील संपूर्ण कलाकारांसह कंगनानं त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. त्यांनी केलंलं काम अप्रतिम आहे. १९७५ च्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटाची कथा उत्तम प्रकारे सादर झाली आहे, चित्रपटाचे संगीत देखील कथेला साजेसे आहे."
Movie: EMERGENCY
— Praneet Samaiya (@praneetsamaiya) January 17, 2025
Rating: ⭐⭐⭐⭐½
Review: BRILLIANT
Kangana Ranaut is OUTSTANDING in this gripping political film on India's darkest chapter 👏#Emergency #EmergencyReview #KanganaRanaut #AnupamKher@KanganaTeam @ManikarnikaFP @ZeeStudios_
Kangana is the heart and soul of the… pic.twitter.com/o3cCagbWA0
When you skip work just to catch the FDFS of your favorite actor... and it's so worth it!
— Rahul Chauhan (@RahulCh9290) January 17, 2025
Reviews will be out shortly 😍
#Emergency #KanganaRanaut pic.twitter.com/wIsQ1OUZPf
#EmergencyReview :
— Tejas (@Tejas01679537) January 16, 2025
⭐️⭐️⭐️⭐️💫
4.5/5 stars.
After a long time saw a good Biopic.The film completely gives a respect to Indira https://t.co/7WbKUhSQFC depicts her sacrifices and mistakes and Cleary portrays her a strong leader. #KanganaRanaut is exceptional 🔥🔥#Emergency. pic.twitter.com/jPe9YbicuY
#Emergency Review:
— $@M (@SAMTHEBESTEST_) January 17, 2025
RATING: ⭐ ⭐ 2/5*#KanganaRanaut has put some effort as an actor with her voice modulation and expression, but as a director, this is a very below average film.
Most of the important scenes are cut short, and some are converted into musicals, which does not… pic.twitter.com/6vXGdbXgdN
'इमर्जन्सी' चित्रपटा पाहून एका युजरनं लिहिले की, "कंगना राणौतनं तिच्या भूमिकेवर खूप मेहनत घेतली आहे, चित्रपटानं मला भावनिक केलं नाही, पण मनापासून धन्यवाद." अनेकांनी म्हटले आहे की चित्रपटात तथ्यांशी छेडछाड करण्यात आली आहे. अनेकांनी या चित्रपटाला प्रचारकी असल्याचंही म्हटलेंआहे. परंतु, बहुतेक लोकांना कंगनाचा लूक आणि चित्रपटातील तिचा अभिनय आवडला आहे.
Shaailesh Singh's review of #Emergency
— Rahul Chauhan (@RahulCh9290) January 17, 2025
" one of the best films in a long time. kangana is outstanding as both director and actor....kangana is indira !!!
huge congratulations to the entire team"
#KanganaRanaut #EmergencyReview pic.twitter.com/ffWNgUeKOF
VIDEO | Punjab: SGPC and other Sikh organisations have demanded a ban on the film 'Emergency'. Screening of the film was stopped in Amritsar.
— Press Trust of India (@PTI_News) January 17, 2025
" today, we have come to stop the release of 'emergency' film. we had sent a letter to the cm as well, but we didn't have any action on… pic.twitter.com/KvquMaiEnk
पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' या चित्रपटाचा जोरदार विरोध होत आहे. शीख समुदायाच्या शिरोमणा गुरुद्वारा प्रबंधक कमिटीनं (एसजीपीसी) या चित्रपटाला विरोध केला आहे. चित्रपटात त्यांना दहशतवादी म्हणून दाखवलं जात असल्याचा आरोप शीख समुदायाचा आहे. अमृतसरमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी एसजीपीसीने केली आहे. एसजीपीसीनं म्हटलं आहे की, आम्ही या संदर्भात पंजाब सरकारला पत्र लिहून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. पंजाब सरकारने चित्रपटगृहांमध्ये आणि रस्त्यांवर कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस दल तैनात केलं आहे. 'इमर्जन्सी' हा चित्रपट आज १७ जानेवारी रोजी सिनेमा प्रेमी दिनानिमित्त प्रदर्शित झाला आहे आणि या निमित्तानं चित्रपटाची तिकिटं ९९ रुपयांना उपलब्ध आहेत.
हेही वाचा -