पुणे - भारतीय लष्करात मानाचे पदी विराजमान होण्याचा मान डॉ. माधुरी कानिटकर या मराठी लष्करी महिला अधिकाऱ्याला मिळाला आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या देशातील तिसऱ्या तर महाराष्ट्रातील पहिल्याच महिला अधिकारी आहेत. लष्कराच्या या मानाच्या पदावर मराठी झेंडा फडकवणाऱ्या डॉ. माधुरी कानिटकर यांचा सर्व महाराष्ट्राला अभिमान वाटतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या मराठी रणरागिणीशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपली मते मांडली.
मुलींसाठी लष्कर सुरक्षित क्षेत्र
सर्वोच्च न्यायालयाचा महिलांना पर्मनंट कमिशन देण्याचा निर्णय खूप चांगला आहे. यामुळे लष्करात महिलांना आता करिअर करण्याची संधी आहे, असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. तसेच लेफ्टनंट जनरल पद मिळाले आहे. मात्र, आणखी शिखरं खुणावतात कॅनव्हास खूप मोठा आहे. त्यात रंग भरायचे आहे. कोरोनासारख्या आपत्तीचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज आहे. कोरोना टाळण्यासाठी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी या आपल्या संस्कृतीतच आहेत. त्या आपण पूर्वीपासून करतच आहोत, असे देखील त्या म्हणाल्या.
हेही वाचा - जागतिक महिला दिन : महिलांचा कायमस्वरुपी सन्मान राखण्याची गरज