पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यात अनेक दिवसांपासून रात्रीच्या सुमारास बिबट्या पाळिव प्राण्यांवर हल्ला करत आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे सतीष रोडे या शेतकऱ्यांच्या घरासमोर बिबट्याने दबक्या पाऊलांनी येऊन पाळिव कुत्र्यावर हल्ला केला. हा बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पहाटेच्या सुमारास लाखणगाव या ठिकाणी सतीश रोडे या शेतकऱ्याच्या घरासमोरील पाळिव कुत्रा वर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत कुत्र्याच्या गळ्यामध्ये चुकांचा पट्टा असल्याने कुत्र्याचा जीव वाचला. जुन्नर, आंबेगाव,शिरुर, खेड तालुक्यात ऊस शेती परिसरातील ग्रामिण भागात बिबट्याचा वावर असून बिबट्या रात्रीच्या सुमारास बाहेर पडुन आपली शिकार शोधत असतो. मात्र, हा बिबट्या आता दबक्या पाऊलांनी लोकवस्तीत येऊन पाळिव प्राण्यांवर हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.