पुणे - आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द गावात, आज पहाटेच्या सुमारास संतोष नारनर या मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला. यात बिबट्याने दोन मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा हा थरार मेंढपाळाच्या समोरच घडला. त्यामुळे येथील मेंढपाळ सध्या भीतीच्या छायेखाली आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. शिकारीच्या शोधात असताना बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. तर, काही ठिकाणी बिबट्यांचे अपघात होत आहेत. त्यामुळे, बिबट्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.