ETV Bharat / state

'मुंबईची तुंबई केली, शिवसेनेने करून दाखवलं; राज्य सरकार सर्व आघड्यांवर फेल'

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पुण्यात विविध विषयांबाबत सरकारच्या कामावर आक्षेप नोंदवत टीका केली. सत्ताधारी पक्ष शिवसेना विविध आघाड्यांवर अपयशी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

author img

By

Published : Sep 23, 2020, 4:35 PM IST

Updated : Sep 23, 2020, 5:03 PM IST

पुणे - 'मुंबईची यांनी तुंबई केली, शिवसेनेने करून दाखवलं' अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. वरवरची कामे करतात, त्यामुळे मूळ मुद्द्यांकडे हे लक्ष देत नाहीत. पावसाळा गेल्यानंतरही 7 ते 8 महिने रस्त्यांवर खड्डे राहतात. 30 ते 40 वर्षे सत्ता उपभोगून शिवसेनेने काय केले? असा प्रश्न दरेकर यांनी केला. ते आज पुण्यात बोलत होते.

अभिनेत्री कंगना ही 'ड्रगिस्ट' असेल तर तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशीच आमची भूमिका असल्याचे देखील दरेकर यावेळी म्हणाले. राज्यातील कोविड परिस्थिती हाताळण्यात या सरकारला अपयश आले आहे. सर्व आघड्यांवर हे सरकार 'फेल' ठरल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील विविध समस्या सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकार कारखान्यांना, शेतकऱ्यांना मदत करते, तशीच ऊसतोड कामगारांनाही मदत केली पाहिजे. याबाबत काम झाले नाही तर विरोधीपक्ष नेते म्हणून आपण त्याचा जाब विचारू, असे दरेकर म्हणाले.

हेही वाचा - पुणे जिल्ह्याला अंमली पदार्थाचा विळखा, आठ महिन्यात तब्बल 1300 किलो गांजा जप्त

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चांविषयी बोलताना ते म्हणाले की, त्यांच्याविषयी निर्णय घेण्यासाठी केंद्रीय कमिटी आहे, त्यामुळे त्यावर मी बोलणे योग्य होणार नाही. सरकारने मराठ्यांना आता आर्थिक दुर्बल घटकांच्या सवलती दिल्या आहेत. त्यावर आपण समाधानी नाही, मराठा समाजाला चांगले पॅकेज द्यायला हवे होते, असे दरेकर म्हणाले. शरद पवारांना प्राप्तिकर विभागाची नोटीस जाणे, ही एक साधारण प्रक्रिया असावी, त्यात विरोधी पक्षाला उगीच त्रास देण्याचा केंद्र सरकारचा अजिबात हेतू नाही, असे स्पष्टीकरण प्रवीण दरेकर यांनी दिले.

गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकास प्रकरणांना अर्थ पुरवठा करण्यासाठी नाबार्डने जे निर्बंध घातले आहेत, ती बंधने उठविण्यासंदर्भात पुण्यातील नाबार्ड संस्थेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापकांची दरेकर यांनी आज भेट घेतली.

हेही वाचा - पुण्यातील धक्कादायक प्रकार..! नातीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मुलाकडून वडिलांचा खून

Last Updated : Sep 23, 2020, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.