ETV Bharat / state

जाणून घ्या; अर्धनारेश्वर भीमाशंकर आणि भीमा नदीची आख्यायिका - भोलेनाथ

समुद्र सापटीपासून सुमारे चार हजार फूट उंचीवर भीमाशंकर हे देवस्थान आहे. या मंदिराची आख्यायिका सांगताना येथील पुजारी सांगतात की, अर्धनारेश्वर म्हणजेच शंकर आणि पार्वती हे दोघेही या ठिकाणी एकत्र आले होते. त्रिपुरासूराचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीने हे रूप धारण केले होते अशी आख्यायिका आहे.

Legend of Bhima river and Ardhanareshwar Bhimashankar
अर्धनारेश्वर भीमाशंकराची आख्यायिका
author img

By

Published : Aug 9, 2021, 12:27 PM IST

भीमाशंकर (पुणे) - श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दरवर्षी भीमाशंकर येथे मोठी यात्रा भरते. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मंदिरे ही बंद करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर भीमाशंकर हे मंदिर देखील बंद केले आहे. तसेच, येथील श्रावणी यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचे सर्व नियमपाळून भीमाशंकर येथे विधिवत पूजा व आरती करण्यात आली. दरम्यान, दर्शनासाठी दूरदूरवरून नागरिक दाखल झाले होतो. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे त्यांना शिखराचेच दर्शन घेऊन परतावे लागले.

दर्शनासाठी दूरदूरवरून नागरिक दाखल

भीमाशंकर मंदिराची आख्यायिका -

समुद्र सापटीपासून सुमारे चार हजार फूट उंचीवर भीमाशंकर हे स्थान आहे. या मंदिराची आख्यायिका सांगताना येथील पुजारी सांगतात की, अर्धनारेश्वर म्हणजेच शंकर आणि पार्वती हे दोघेही एकत्र या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूराचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीने हे रूप धारण केले होते. त्यावेळी शंकराने तीव्र स्वरूपाचे उग्र रूप घेतले होते. यालाच भीमरूप असे म्हटले जाते. त्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे संबोधले जाते. अनाधी काळापासून हे मंदिर स्वयंभू असल्याचे येथील पुजारी सांगतात. विनायकराव भिडे यांनी या मंदिराचा इ.स. १२०० मध्ये जीर्णोद्धार केला आहे. समोरचा दगडी शिल्पामध्ये सभामंडप हा भाविकांची गर्दी ओळखून १९६४ मध्ये जीर्णोद्धार समितीने याचे काम पूर्ण केले आहे.

भीमाशंकर मंदिराची आख्यायिका

भीमा नदीच्या उगमस्थानाची आख्यायिका -

पुणे जिल्ह्यातील अनेक भागात ज्या नदीमुळे शेतकऱ्यांची भरभराट झाली. त्या भीमा नदीचा उगम देखील याच ठिकाणी झाला आहे. या नदीकाठी वसलेल्या गावांना देखील भीमा नदीच्या नावाने ओळख निर्माण झाली आहे. जसे की, टाकळी भीमा, कोरेगाव भीमा ही शिरूर तालुक्यातील गावे आहेत. या नदीच्या उगमाची माहिती देताना पुजारी सांगतात की, जेव्हा त्रिपुरासूराचा वध करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू, महेश, शंकर, पार्वती ज्या ठिकाणी बैठक पार पडली. त्याच ठिकाणी त्रिपुरासूरा राजाची राजधानी होती. त्रिपुरासूराचा वध केल्यानंतर शंकराच्या शरीरातून घामाचा लोट बाहेर पडत होता. त्याच घामाच्या लोटातून भीमा नदीचा उगम झाला असल्याचेही पुजाऱ्यांनी सांगितले.

भीमा नदीच्या उगमस्थानाची आख्यायिका

हेही वाचा - इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर मंदिर पाण्यात, भीमेचा प्रवाह बदलल्यानेच मंदिरात पाणी शिरल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.