पुणे - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली. संबंधित रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. फडणवीस दाखल होताच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. सध्या १८००हून अधिक रुग्ण आहेत. आज विरोधी पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवल्याचे चित्र होते. यावेळी फडणवीस रुग्णालयातील डॉक्टरांसोबत बैठक घेणार आहेत.
भाजपचे सर्व पदाधिकारी फडणवीस यांच्यासोबत उपस्थित आहेत. सध्या फडणवीस राज्यातील विविध शहरांतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.