ETV Bharat / state

Lavani Festival Dubai: आखाती देशात यंदा प्रथमच लावणी महोत्सव, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची उपस्थिती

आखाती देशात महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृती व लोककलेची ओळख करून देण्यासाठी यंदा प्रथमच लावणी महोत्सवाचे ( Lavani festival ) आयोजन करण्यात आले आहे. अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्सच्या वतीने यांनी प्रथमच लावणी महोत्सवाचे दुबई येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन केले आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या कार्यक्रमात लावणी सादर करणार आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 9, 2022, 4:15 PM IST

पुणे : आखाती देशात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृती व लोककलेची ओळख करून देण्यासाठी यंदा आखाती देशात प्रथमच लावणी महोत्सवाचे दुबई ( Lavani festival Dubai ) येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन केले आहे. महाराष्ट्राची लोककला, संस्कृती व शान “लावणी” आखाती मराठी व आंतराष्ट्रीय प्रेक्षकापर्यंत पोहचविण्यासाठी ईन्स्पायर इव्हेंट्सच्या युएईच्या वतीने या विशेष महोत्सवाचे आयोजन ( Lavani festival ) केले आहे.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची उपस्थिती: आखातातील मराठी मंडळींचे आपली संस्कृती विषयक प्रेम व आदर पाहून सर्व स्थानिक कलावंताना या कार्यक्रमाच्या दरम्यान लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचे खास मार्गदर्शन लाभणार आहेत. लावणी महोत्सवात यूएईतील स्थानिक कलावंत लावणी व सवाल-जवाब यासारखे सांस्कृतिक नृत्य प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करणार आहेत. दुबई येथील सागर जाधव ( एस.जे.लाईव) हे हा कार्यक्रम जगातील सर्व ऑनलाईन प्रेक्षकांपर्यंत फेसबूक लाईवच्या माध्यमातून पोहोचविणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक चंद्रशेखर जाधव व त्यांचे सर्व सहकारी अथक मेहनत घेऊन भव्य व आदर्श असा आंतरराष्ट्रीय लावणी महोत्सव आयोजित करून अटकेपार झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकविणार आहेत.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लावणी महोत्सवाविषयी माहिती देताना

लावणी सादर करणार: यूएई येथील स्थानिक मराठी प्रेक्षकांना लाभलेली ही सुवर्ण पर्वणी आहे. या कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर हे देखील लावणी सादर करणार आहे. सुरेखा पुणेकर यांनी आत्तापर्यंत परदेशात दोन ठिकाणी लावणी सादर केलेले आहे येणाऱ्या काळात विदेशात आंतरराष्ट्रीय लावणीचे कार्यक्रम घेण्याचा मानस असल्याचे देखील यावेळी पुणेकर यांनी म्हटले आहे.

राज्यपालांवर कारवाईची मागणी: राज्यातील प्रश्नांबाबत सुरेखा पुणेकर म्हटले की, राज्यपालांना ते ज्या राज्यातून आलेले आहे ते राज्यात पुन्हा पाठवले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी सरकारच्या वतीने का कारवाई केली जात नाही हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तसेच जे राज्यातून उद्योग इतर राज्यात जात आहे. यावर देखील पुणेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.