ETV Bharat / state

महाजनादेश यात्रेत 'एकच वादा अजित दादा'चा जयघोष, पोलिसांचा लाठिचार्ज - cm in baramati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा सुरु असताना अजित दादा जिंदाबाद, एकच वादा अजित दादाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी गोंधळ होऊ नये, म्हणून पोलिसांनी लाठिचार्ज करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना हुसकावून लावले.

लाठीचार्ज करताना पोलीस
author img

By

Published : Sep 14, 2019, 6:20 PM IST

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा सुरु असताना अजित दादा जिंदाबाद, एकच वादा अजित दादा च्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या जमावाला पोलिसांनी हुसकावून लावत लाठीचार्चही केला. देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज दुपारी बारामतीमध्ये पोहोचली. दरम्यान, या जनादेश यात्रेपूर्वी बारामतीमध्ये लावण्यात आलेल्या डॉल्बी साऊंड सिस्टिमला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध करण्यात आला होता. गणपती दहीहंडीमध्ये साऊंड सिस्टिमला बंदी घालता, मग आता एवढे मोठे साऊंड का लावता, असा आक्षेप घेण्यात आला होता. दरम्यान, या घटनेचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

घटनास्थळावरील दृश्य

मी बारामतीत येणार असल्याचा राष्ट्रवादीने एवढा धसका घेतला आहे की, त्यांनी येथे लावलेल्या साऊंड सिस्टिम व फलकावर आक्षेप घेत माझा आवाज रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना माहिती नाही की, हम मोदी जी के बाशिंदे है, हमारा आवाज कोई बंद नही कर सकता, अशी शेरेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने केवळ स्वागत सभा ठरवली होती. मात्र, बारामतीकरांचा एवढ्या मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळत, असल्याचे पाहून आगामी काळात नक्की बारामतीत परिवर्तन घडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:बारामतीत महाजनादेश यात्रा, मुख्यमंत्राच्या भाषणा वेळी गोधळ घालणाऱ्या जमावावर पोलिसांचा लाठीमारBody:mh_pun_06_mahajndesh_yatra_baramati_gondhal_av_7201348

Anchor
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा सुरु असताना अजित दादा जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी घोषणा बाजी करणाऱ्या जमावाला पोलिसांनी हुसकावून लावत लाठीमारही केला देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दुपारी बारामती मध्ये पोहोचली दरम्यान या जनादेश यात्रेपूर्वी बारामतीमध्ये लावण्यात आलेल्या डॉल्बी साऊंड सिस्टिमला राष्ट्रवादी काँग्रेस कडून विरोध करण्यात आला होता गणपती दहीहंडी मध्ये साऊंड सिस्टिम मला बंदी घालता मग आता एवढे मोठे सांग का लावता असा आक्षेप घेण्यात आला होता दरम्यान या घटनेचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला
बारामती...मी बारामतीत येणार असल्याचा राष्ट्रवादीने एवढा धसका घेतला आहे की, त्यांनी येथे लावलेल्या साऊंड सिस्टिम व फलकावर आक्षेप घेत माझा आवाज रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना माहिती नाही की, हम मोदी जी के बाशिंदे है हमारा आवाज कोई बंद नही कर सकता, अशी शेरेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी वर टीकास्त्र सोडले.महा जनादेश यात्रेच्या निमित्ताने केवळ स्वागत सभा ठरवली होती. मात्र बारामतीकरांचा एवढा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळत, असल्याचे पाहून आगामी काळात नक्की बारामतीत परिवर्तन घडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.