ETV Bharat / state

Laparoscopic surgery : ३ वर्षांच्या पाळीव कुत्र्यावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया; भारतातील अशी पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे शहरात पित्ताशयाच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या ३ वर्षांच्या पाळीव कुत्र्यावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पित्ताशयाच्या आजारासाठी पाळीव कुत्र्यावर केलेली लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. नरेंद्र परदेशी यांनी म्हटले आहे.

Laparoscopic surgery
Laparoscopic surgery
author img

By

Published : Jun 28, 2023, 4:31 PM IST

कुत्र्यावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया

पुणे : डॉ नरेंद्र परदेशी (पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक), प्रख्यात बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शाह, डॉ. सुशील खरात, पशुवैद्यकीय सहाय्यक रीना हरिभट यांच्या पथकाने पित्ताशयाच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या ३ वर्षांच्या पाळीव कुत्र्यावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली आहे. पित्ताशयाच्या आजारासाठी पाळीव कुत्र्यावर केलेली लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

डॉबी आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. पण काही दिवसांपासून, तो शांत झाला होता. पोटदुखीमुळे सहसा खाणे, इकडे तिकडे धावणे किंवा घरात खेळणे तो टाळत होता. जेव्हा आम्हाला डॉबीच्या पित्ताशयाच्या संसर्गाची माहिती मिळाली तेव्हा, आम्ही घाबरलो. डॉक्टरांच्या टीमने डॉबीचे प्राण वाचवल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो. - विजय बदाडे

कुत्र्यांच्या पित्ताशयावर सूज : पुणे शहरातील विजय बदाडे यांच्या डॉबी या 3 वर्षीय पाळीव कुत्र्याला पोटदुखी, उलट्या, आमांशाचा त्रास होऊ लागल्याने कुंटूंब चिंतेत होते. डॉबीला गेल्या काही दिवसांपासून ओटीपोटात दुखणे, उलट्या होत होत्या. तसेच त्याचे यकृतातील एन्झाईम्स वाढले होते. डॉबीच्या रक्ताची डॉक्टरांनी तपासणी केली असता रक्ताच्या नमुन्यांमध्ये प्लेटलेट्सची पातळी 77 हजारांनी कमी झाल्याचे दिसून आले. त्याला सलाईन तसेच इंजेक्शन देण्यात आले. नंतर त्याच्या यकृताची स्थिती तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड करण्यात आला, ज्यामध्ये कुत्र्यांच्या पित्ताशय वाढलेले दिसले. त्यानंतर डॉ. पित्ताशय काढण्याचा निर्णय घेतला.

सुमारे २ तास कुत्र्यावर शस्त्रक्रिया : डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले की, डॉबीचे पित्ताशय काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा त्याला सुरक्षित प्रक्रियेसाठी भूल देण्यात आली. त्यानंतर डॉबीमध्ये 1 सेमी लॅपरोस्कोपची 2 छिद्रे, अर्ध्या लेप्रोस्कोपिक चीराची 3 छिद्रे केली त्यानंतर लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया पार पडली. पारंपारिक शस्त्रक्रियेप्रमाणे 10-12-इंच चीरा देऊन पोट पूर्णपणे उघडण्याऐवजी, पित्ताशय काढून टाकण्यासाठी लॅपरोस्कोपी करण्यात आल्याचे परदेशी म्हणाले. त्यामुळे ओपन सर्जरीच्या तुलनेत कमी रक्तस्त्राव झाला. शस्त्रक्रियेनंतर 30-40 मिनिटांत डॅबीला बरे वाटले. सुमारे २ तास ही शस्त्रक्रिया चालली.

डॉबी पोटदुखीपासून मुक्त : 1 तासानंतर त्याने घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली. तसेच 3-4 तासांनंतर त्याने द्रव पदार्थ खाल्ले. ऑपरेशननंतर त्याच दिवशी डॉबीला घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर 3 दिवस इंजेक्शनसाठी रुग्णालयात आणण्यात आले. यावर वेळीच उपचार न केल्यास पित्ताशयाचे खडे, पित्ताशय फुटणे, यकृत, ओटीपोटात संक्रमण आणि दीर्घकालीन वेदनांमुळे मृत्यू होऊ शकतो, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर, संसर्ग टाळण्यासाठी पाळीव प्राण्यांच्या हालचालींवर 7 दिवस प्रतिबंधित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आता डाबी पोटदुखीपासून मुक्त होऊन पूर्णपणे बरा झाला आहे.

दुर्मीळ गुंतागुंतीची शस्त्रक्रिया : यावर, प्रख्यात बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शाह म्हणतात, कुत्र्यांमध्ये लॅपरोस्कोपिक पित्ताशय काढून टाकणे ही मानवांच्या तुलनेत एक दुर्मीळ गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. जी मानवांमध्ये खूप सामान्य आहे. यकृताच्या मध्यभागी ट्रोकार आणि कॅन्युला घालणे आणि सामान्य पित्त नलिकामध्ये प्रवेश करणे हे मोठे अडथळे होते. सामान्य पित्त नलिकामध्ये लिगेशन आणि हेमोक्लिप लावणे अधिक आव्हानात्मक होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.