पुणे Lalit Patil Drugs Case : ड्रग माफिया ललित पाटीलनं अमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून सोनं विकत घेतल्याचं समोर आलं होतं. गुरुवारी पुणे पोलिसांची टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर 5 किलो सोनं जप्त केलंय. याशिवाय अमली पदार्थ तयार करणाऱ्या ललित पाटील आणि 12 साथीदारांच्या टोळीवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केलीय.
एकूण आठं किलो सोनं जप्त : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्ड क्रमांक 16 मधून अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेल्याची घटना घडली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली. आता त्याचा ताबा पुणे पोलिसांनी घेतलाय. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या घराची तपासणी केली, तेव्हा त्याच्या घरातून 3 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा पुणे पोलिसांची टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर त्यांनी पाच किलो सोनं जप्त केलय. आतापर्यंत पोलिसांनी ललित पाटीलकडून 8 किलो सोनं जप्त करण्यात आलंय.
ललित पाटील आणि टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई : ड्रग माफिया ललित आणि भुषण पाटील यांनी ड्रग विक्रीतून आलेल्या पैशातून मोठ्याप्रमाणावर सोनं खरेदी करून ठेवल्याचं तपासात समोर आलंय. पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या नाशिक इथल्या घराची चौकशी केली असता पोलिसांच्या हाती आतापर्यंत 8 किलोहून अधिक सोनं सापडलंय. याशिवाय अमली पदार्थ तयार करणाऱ्या ललित पाटील आणि त्याच्या 12 जणांच्या टोळीवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाईदेखील केलीय.
7 दिवसांची पोलीस कोठडी : ललित पाटीलच्या नाशिकमधील कारखान्यात आतापर्यंत तयार झालेलं मेफेड्रोन (एमडी) ड्रग मुंबईत विकल्याचं ललित पाटीलनं सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. नाशिक येथील कारखान्यात दरमहा 200 किलो ड्रग्ज तयार केलं जायचं. या संपूर्ण प्रकरणात ड्रग्स तयार करण्यात अरविंदकुमार लोहरे मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय. पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून ललित पाटीलला अटक केली आहे. त्याला न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. पोलीस त्याच्याकडे आता कसून तपास करत आहेत. त्यांच्या तपासातून सातत्यानं धक्कादायक माहिती समोर येत आहे.
हेही वाचा :
- Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं जप्त; पुणे पोलिसांची नाशकात कारवाई
- Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचे मराठवाडा कनेक्शन; कच्चा माल घेण्यासाठी पसरले जाळे, ससूनमधून पळाल्यावर थांबला संभाजीनगरात?
- Lalit Patil Case Update : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिकच्या सराफा व्यापाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक