ETV Bharat / state

महागाईच्या काळातही सर्वसामान्य नागरिकांसाठी 'येथे' स्वस्तात लाडू, चिवडा उपलब्ध

author img

By

Published : Oct 20, 2022, 5:07 PM IST

महागाईच्या काळात ही सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी यंदाही दी पूना मर्चंट्स चेंबरकडून रास्त भावात लाडू-चिवडा उपक्रमाला सुरवात करण्यात आली ( Ladu Chivda sold at Cheap Price ) आहे. यंदा या उपक्रमाचे ३५ वे वर्ष आहे. आज पासून या उपक्रमाला सुरवात झाली आहे. या वर्षी लाडू-चिवड्याच्या प्रति किलोचा भाव दीडशे रुपेय आहे आहे. तसेच विशेष म्हणजे यंदा अर्धा किलोच देखील पॅकेट्स देखील उपलब्ध झाले आहेत. या आर्ध्या कीलोचा भाव ८० रुपये असल्याची माहिती दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी यावेळी दिली.

Ladu chivda at cheap price
स्वस्तात लाडू चिवडा उपलब्ध

पुणे : महागाईच्या काळात ही सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी यंदाही दी पूना मर्चंट्स चेंबरकडून रास्त भावात लाडू-चिवडा उपक्रमाला सुरवात करण्यात आली ( Ladu Chivda sold at Cheap Price ) आहे. यंदा या उपक्रमाचे ३५ वे वर्ष आहे. आज पासून या उपक्रमाला सुरवात झाली आहे. या वर्षी लाडू-चिवड्याच्या प्रति किलोचा भाव दीडशे रुपेय आहे आहे. तसेच विशेष म्हणजे यंदा अर्धा किलोच देखील पॅकेट्स देखील उपलब्ध झाले आहेत. या आर्ध्या कीलोचा भाव ८० रुपये असल्याची माहिती दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी यावेळी दिली.

स्वस्तात लाडू चिवडा उपलब्ध

यंदा उपक्रमाचे 35 वें वर्ष : दी पूना मर्चंट्स ( The Poona Merchants ) चेंबरच्यावतीने गेल्या 35 वर्षापासून रास्त भावात लाडू चिवडा विक्री केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी आणि नागरिकांना चांगल्या दर्जाचं आणि कमी किमतीमध्ये लाडू चिवडा उपलब्ध व्हावा म्हणून चेबरच्यावतीने रास्त भावात लाडू चिवडा विक्री केली जात आहे. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली ( Record in Guinness Book of Records ) आहे. त्याशिवाय लिंबका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाली ( Record in Limbaka Book of Record ) आहे. आजपासून भट्टी सुरू झाली असून येत्या 24 तारखेपर्यंत ही भट्टी अशीच सुरू राहणार आहे.

Ladu chivda at cheap price
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

तब्बल 400 कामगार : यंदाच्या या उपक्रमात तब्बल 400 कामगार हे काम करत असून या सर्व कामगारांची मेडीकल तपासणी करण्यात आली आहे तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून या महिला व पुरुष कामगारांना काम देखील उपलब्ध होत आहे.तसेच चेंबरच्या सदस्यांच्या देखरेखीखाली उत्कृष्ट पॅकिंगमध्ये तसेच स्वच्छ वातावरणात लाडू-चिवडा तयार केला जातो. पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जयजिनेंद्र प्रतिष्ठान येथे अहोरात्र लाडू, चिवडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रास्त दरात वितरण करीत असतानाच त्याचा दर्जा उत्कृष्ट राखला जातो. यंदा या उपक्रमाचे 35 वे वर्ष आहे. पुणेकरांकडून चेंबरच्या या उपक्रमास 100 टक्के प्रतिसाद दिला जातो.

Ladu chivda at cheap price
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

वीस ठिकाणी विक्री केंद्रे : आजपासून शहरातील वीस विक्री केंद्रावर लाडू-चिवडा विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दी पूना मर्चंट्स चेंबरचे मार्केट यार्डातील व्यापार भवन, ग्राहक पेठ (टिळक रस्ता), आझाद मित्र मंडळ (पुष्पमंगल कार्यालय, बिबवेवाडी), शेष क्रेशर बंगला (ओसवाल बंधू मंगल कार्यालयासमोर, शंकरशेठ रस्ता), जयश्री ग्रोसरी अँड ड्रायफ्रुटस प्रा. लि. (कोथरुड), भगत ट्रेडर्स (सिंहगड रस्ता), आगरवाल सेल्स काॅर्पोरेशन (कर्वेनगर), व्ही. एन. एंटरप्रायजेस (पदमावती मंदिरासमोर), अर्बन बझार (सिंहगड रस्ता), पवन ट्रेडर्स (चंदननगर), श्रीराम जनरल स्टाेअर्स (चिंचवड), निखील ग्रोसरी वर्ल्ड (आळंदी). विजय ट्रेडिंग कंपनी (काेंढवा), श्री वर्धमान जैन श्रावक संघ (आकुर्डी), श्री साई सामाजिक सेवा (कसबा पेठ), श्री लक्ष्मी ब्युटी चाॅईस लेडीज शाॅपी (खडकी), सह्याद्री सेवा प्रतिष्ठान (पर्वती), दिपिका दीपक नेवे (खराडी) अशा वीस ठिकाणी लाडू-चिवडा विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.