ETV Bharat / state

कृषिक २०२०: बारामतीत शेती प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद; आधुनिक तंत्रज्ञानासोबत समृद्ध शेतीचे धडे - pune agriculture

बारामतीत 'कृषिक - 2020'  प्रदर्शनाला राज्यासह देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 'अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच अन्य कृषीविषयक गोष्टींची माहिती देण्यात आली.

krushi pradarshan in baramat
बारामतीत 'कृषिक - 2020'  प्रदर्शनाला राज्यासह देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
author img

By

Published : Jan 20, 2020, 8:10 PM IST

पुणे - बारामतीत 'कृषिक - 2020' प्रदर्शनाला राज्यासह देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 'अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच अन्य कृषीविषयक गोष्टींची माहिती देण्यात आली. आधुनिक शेतीसंबंधी प्रत्यक्षिकांचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे.

बारामतीत 'कृषिक - 2020' प्रदर्शनाला राज्यासह देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

या प्रदर्शनातून शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांची माहिती देण्यात आली. यामध्ये पशुपालन, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांवरही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सौर ऊर्जा, हवे वरील शेती, फळबाग लागवड यांसह दुग्धउत्पादन, फळ प्रक्रिया, कृषी पर्यटन हे शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. देशातील सर्वाधिक लहान (दोन फूट तीन इंच व तीन फूट) उंचीच्या गाई या प्रदर्शनाचे आकर्षण आहेत. या गाई मूळच्या आंध्र प्रदेश, केरळ व तामिळनाडू मध्ये आढळतात. प्रथमच अशा गाई पाहिल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. पशुपक्षी प्रदर्शनात तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेला मालेगावचा पिंटू घोडा आकर्षण ठरत आहेत. तसेच खिल्लार व दानी गाय-बैल पाहायला पर्यटकांनी गर्दी केलीय.

याचसोबत दोन लाखांना मागणी करण्यात आलेली अकरा महिन्यांची खिलार जातीची कालवड, आठ दाती जातीचे बोकड, राजस्थानचे कोटा बोकड आणि बोर तसेच बायक वळू यांवर भेट देणाऱ्यांच्या नजरा खिळून आहेत. विविध नावलौकिक कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात शासनाच्या कृषी संशोधन संस्था, बँका, कृषी शिक्षण संस्था तसेच खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी अवजारे व यंत्रे यांच्याशी निगडीत बहुसंख्य कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

यंदा विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग असल्याची माहिती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी दिली. तसेच यांमध्ये तरूणांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे ते म्हणाले. प्रदर्शनातील सहभाग वाढत असल्याने आगामी काळात शेतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

मागील चार वर्षांपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून यंदाचे पाचवे वर्ष आहे. शेती व पाण्यासंदर्भातील समस्या तसेच विषमुक्त अन्नाची चळवळ यासंबंधी विविध प्रश्न सोडवण्याचा या प्रदर्शनाचा हेतू असल्याचे सुनंदा पवार यांनी सांगितले.

प्रदर्शनाची मुख्य वैशिष्टये

१) अॅक्वामॉनिक्स पद्धतीने (पाण्यावरील) मासे व भाजीपाला उत्पादन
२) अॅरोपॉनिक्स पद्धतीने (हवेवरील) विषमुक्त भाजीपाला उत्पादन
३) पाॉलिहाऊस मधील अंजीर लागवड, प्रक्रिया व विक्री व्यवस्था
४) कलमी रोपांद्वारे भाजीपाला लागवड तंत्रज्ञान
५) आधुनिक बांबू लागवड व विक्री व्यवस्था
६) विविध देशातील माती विरहित शेतीचे प्रयोग
७) 110 एकर प्रक्षेत्रावरील शेतीपूरक प्रात्यक्षिके
८) 350 हून अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय स्टॉल.
९) गाईंचा आधुनिक गोठा, शेळी पालन, कुक्कुट पालन, गांडूळ खत प्रकल्प
१०) जातीवंत जनावरांचे पशु-पक्षी प्रदर्शन

Intro:Body:कृषिक २०२०
बारामती-
बारामती येथील कृषिक 2020 च्या प्रदर्शनाला महाराष्ट्र व विविध राज्यांसह  देशविदेशातून  मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी. यासह शेती उपयोगी आधुनिक नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिकांसह माहिती देण्याचे महत्त्वपूर्ण काम या प्रदर्शनातून करण्यात येते.
 
या प्रदर्शनातून शेतीबरोबरच शेती संलग्न व्यवसायासाठी उपयुक्त असणाऱ्या पशुपालन, मधमाशी  पालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यासंबंधीही शेतकऱ्यांना इतंभूत माहिती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात येत आहे. या प्रदर्शनात सौर ऊर्जासह हवे वरील शेती, कमी खर्चात शेती, फळबाग लागवड, लाकडाचे घर यासह दुग्धउत्पादन फळप्रक्रिया कृषी पर्यटन आदींच्या प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
 
या प्रदर्शनात देशातील सर्वाधिक लहान असणाऱ्या दोन फूट तीन इंच व तीन फूट उंचीच्या गाई मूळच्या आंध्र केरळ तामिळनाडू मध्ये आढळणाऱ्या गाई आकर्षक ठरत असून प्रथमच अशा काही पाहत असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. पशुपक्षी प्रदर्शनात तिनदा महाराष्ट्र केसरी झालेला मालेगाव चा पिंटू घोडा तसेच खिल्लार व दानी गाय बैल दोन लाख रुपये किमतीला मागणी करण्यात आलेली अकरा महिन्याची खिलार जातीची कालवड, शेळीच्या आठ दाती जातीचे बोकड,  राजस्थानचे कोटा बोकड व बोर तसेच बायक वळू आणि शो साठी वापरला जाणारा  देवणी वळू चे  प्रदर्शन पाहायला शेतकरी गर्दी करत आहेत.
 
विविध नावलौकिक कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग कृषी संशोधन संस्था, बँका, कृषी शिक्षण संस्था खते, बियाणे कीटकनाशके, कृषी अवजारे व यंत्रे,  विविध प्रक्रिया उद्योग ठिबक व तुषार आणि ग्रीन हाऊस मधील तंत्रज्ञानातील बहुसंख्य कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
 
यंदाच्या कृषी प्रदर्शनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातील हजारो शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत विशेषता विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे त्यात तरुण शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे तरुणांचा या प्रदर्शनातील सहभाग वाढत असल्याने आगामी काळात शेतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल अशी आशा असून आनंद वाटत असल्याचे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार यांनी सांगितले.
 
मागील चार वर्षांपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून यंदाचे हे कृषिक 2020 हे पाचवे कृषी प्रदर्शन आहे शेती व पाण्यात संदर्भातील शेतकऱ्यांच्या असणाऱ्या समस्या व विषमुक्त अन्न ही जी चळवळ आहे त्या संदर्भातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे या प्रदर्शनातून सोडवण्याचा या प्रदर्शनाचा हेतू असतो असे सुनंदा पवार म्हणाल्या.
 
प्रदर्शनाची मुख्य वैशिष्टये
१)     अँक्वामाँनिक्स पध्दतीने (पाण्यावरील) मासे व भाजीपाला उत्पादन.
२)     अँरोपाँनिक्स पध्दतीने (हवेवरील) विषमुक्त भाजीपाला उत्पादन.
३)     पाँलिहाऊस मधील अंजीर लागवड, प्रक्रिया व विक्री व्यवस्था.
४)     कलमी रोपांव्दारे भाजीपाला लागवड तंञज्ञान.
५)     आधूनिक बांबू लागवड व विक्री व्यवस्था.
६)     विविध देशातील मातीविना शेतीचे प्रयोग.
७)     ११० एकर प्रक्षेञावर शेतीपूरक प्रात्यक्षिक.
८)     ३५० हून अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय स्टाँल.
९)     आधुनिक गाई गोठा, शेळी पालन, कुक्कुट पालन, गांडूळ खत प्रकल्प.
१०) जातिवंत जनावरांचे पशु-पक्षी प्रदर्शन.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.