ETV Bharat / state

कोरेगाव भीमा येथील लढाईचा काय आहे इतिहास? 'या' कारणानं साजरा केला जातो शौर्य दिवस - शौर्य दिवस

History of Koregaon Bhima : कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारी रोजी झालेलं युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धात सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळंच इंग्रजांना विजय मिळवता आला. त्या विजयाचं प्रतिक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ उभारला. त्यावर युद्धामध्ये धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली. तेव्हापासून या विजयस्तंभाजवळ शौर्य दिवस साजरा केला जातो.

कोरेगाव भिमा
कोरेगाव भिमा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 9:31 AM IST

कोरेगाव भिमा History of Koregaon Bhima : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा इथं भीमा नदीच्या काठावर 1 जानेवारी 1818 ला दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं. इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत सर्व जाती-धर्मांचे 500 सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला 12 तास रोखून धरलं होतं. इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळताच पेशव्यांनी युद्धातून काढता पाय घेतला. परिणामी इंग्रजांचा या युद्धात विजय झाला होता.

बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी युद्ध : पुणे हा पेशव्यांचा बालेकिल्ला होता. मात्र, पुण्यावर ब्रिटिशांच्या सत्तेची पकड होती. आपला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले होते. याची माहिती मिळताच इंग्रजांनीही पेशव्यांशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. पेशव्यांकडं 28 हजार सैन्य होतं. तर इंग्रजांकडे फक्त 800 सैनिक होते, असा दावा इतिहासकार करतात. कॅप्टन फ्रांन्सिस एफ. स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हे युद्ध केलं.

इंग्रजांनी उभारला विजयस्तंभ : या युद्धात इंग्रजांच्या 275 सैनिकांचा आणि पेशव्यांच्या सुमारे 600 सैनिकांचा मृत्यू झाला, असे दाखले अनेक पुस्तकांमधून देण्यात येतात. या युद्धात सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळंच इंग्रजांना विजय मिळाला. त्या विजयाचं प्रतिक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभ उभारला. त्यावर युद्धामध्ये धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली. तेव्हापासून या विजयस्तंभाजवळ शौर्य दिवस साजरा केला जातो.

  • शौर्यदिनाचं काय आहे महत्त्व : पेशव्यांच्या राजवटीत दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात होती. दलितांना त्यांचे मुलभूत अधिकारही नाकारले जात होते. त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती. त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. पेशव्यांचा पराभव केला. याचीही किनार या विजयाला असल्यानं दलित समाजाच्या नजरेत या दिवसाचं खूप महत्त्व आहे.

हेही वाचा :

  1. सोम्या गोम्याच्या बोलण्यावर मी उत्तर देत नाही- अजित पवार यांची 'या' नेत्यावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.