ETV Bharat / state

पुण्यात अल्पवयीन मुलाचे अपहरण, नग्न करून कोयत्याने मारहाण - manjari boy kidnaping

विनित सूर्यकांत बिरादार ऊर्फ रेड्डी (वय-१९), शुभम राजाभाऊ जाधव (वय-१९), देविदास ऊर्फ देवा घनश्याम पाहणे (वय-२१), भारत विशाल राठोड (वय-२१) आणि समील कलिंदर शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

manjari boy kidnaping
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून नग्न करीत कोयत्याने मारहाण; पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक प्रकार
author img

By

Published : Mar 15, 2020, 7:26 PM IST

पुणे - किरकोळ कारणावरून झालेल्या वादात हडपसर परिसरातील एका १६ वर्षाच्या मुलाचे ५ जणांनी अपहरण केले आणि नग्न करून त्याला कोयता आणि बेल्टने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगा बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी त्याच्या तोंडावर मुत्र विसर्जन केल्याचाही संतापजनक प्रकारही केला आहे. ही घटना १२ मार्च रोजी मांजरी परिसरात घडली. मारहाण झालेला मुलगा अजूनही बेशुद्धावस्थेत असून, ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे.

विनित सूर्यकांत बिरादार ऊर्फ रेड्डी (वय-१९), शुभम राजाभाऊ जाधव (वय-१९), देविदास ऊर्फ देवा घनश्याम पाहणे (वय-२१), भारत विशाल राठोड (वय-२१) आणि समील कलिंदर शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला मुलगा 12 मार्चला शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने त्याच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर हडपसर पोलिसांना एक मुलगा मांजरी रेल्वे रुळाजवळ बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मुलगा बेशुद्धावस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नव्हती.

दरम्यान, मारहाण झालेल्या एका मुलाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत होता. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तेव्हा पोलिसांनी हरविलेल्याची तक्रार दिलेल्या मुलाच्या आईवडिलांना हा व्हिडिओ दाखविला. तो पाहून त्यांनी त्यातील मुलगा आमचाच असल्याने सांगितले. त्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयात जाऊन मुलाला पाहिले. तेव्हाही हा मुलगा बेशुद्ध असल्याचे आढळून आले. या व्हिडिओवरुन पोलिसांना आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक केली आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.