ETV Bharat / state

Asha Pawar Wants Ajit Pawar CM : काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार यांच्या मातोश्रींच मतदान, मुख्यमंत्री पदावरून केलं मोठ वक्तव्य - Katewadi Gram Panchayat Election

Asha Pawar Wants Ajit Pawar CM : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा त्यांच्या मातोश्री आशा पवार यांनी व्यक्त केली.

Asha Pawar Wants Ajit Pawar CM
Asha Pawar Wants Ajit Pawar CM
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 10:50 AM IST

Updated : Nov 5, 2023, 11:46 AM IST

बारामती Asha Pawar Wants Ajit Pawar CM : मी हयात आहे, तोपर्यंत माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी व्यक्त केलीय. बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी आज मतदानाला सुरुवात झालीय. काटेवाडीत होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मातोश्री आशा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. तेव्हा माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आशा पवार यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलीय.

  • काटेवाडीत तिरंगी लढत : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीत सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत आहे. महायुतीत असलेल्या शिंदे- फडणवीस आणि पवार यांच्यातच थेट लढत असल्याचं चित्र काटेवाडीत आहे. त्यामुळं अवघ्या महाराष्ट्राचं काटेवाडी ग्रामपंचायतीकडे लक्ष लागलं असून प्रतिष्ठेची लढत म्हणून बघितलं जातंय.

महायुतीतील घटक पक्षामधील लढत : बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. तर काटेवाडी ही पवार कुटुंबीयांच्या नावानं ओळखली जाते. गेली कित्येक वर्षांपासून काटेवाडी ग्रामपंचायतवर पवार कुटुंबीयांचं वर्चस्व आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादीमधून बंड केलेले अजित पवार, शिंदे- फडणवीस यांच्या सत्तेत सामील झाले. तरीही महायुतीत एकत्र असलेले शिंदे -फडणवीस आणि पवार यांच्यामध्येच काटेवाडी ग्रामपंचायत जिंकण्यावरून काटे की टक्कर बघायला मिळत आहे. यावर्षी भाजप, शिंदे गटदेखील सरपंच पदाच्या या निवडणुकीत नशीब आजमावत अजित पवार गटाला टक्कर देत आहे. असं असलं तरी अजित पवार गटाचं प्राबल्य जास्त असल्याने शिंदे गट आणि भाजप अजित पवार गटाच्या आव्हानासमोर टिकणार का हे बघावं लागेल.

थेट जनतेतून निवडणार सरपंच : यापूर्वी 2017 मध्ये काटेवाडी ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती. तेव्हा प्रथम जनतेतून थेट सरपंच निवडण्यात आला होता. यावेळीदेखील सलग दुसऱ्यांदा काटेवाडी ग्रामस्थ थेट जनतेतून सरपंच निवडणार आहेत. विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे. तर पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पांडुरंग कचरे यांच्याकडून भाजप पुरस्कृत पॅनलची बांधणी करण्यात आली आहे. आदर्श ग्रामपंचायत असा नावलौकिक मिळवणाऱ्या काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. Gram Panchayat Election 2023 : अजित पवारांची काटेवाडीत प्रतिष्ठा पणाला, भाजपानं पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला पराभूत करण्याचं आव्हान
  2. Gram Panchayat Election 2023 : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूनं?

Last Updated : Nov 5, 2023, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.