ETV Bharat / state

Pimpri Chinchwad By Election : शरद पवारांच्या पुण्यातल्या सत्ता संघर्षाला धार, अंतर्गत बेबनावामुळे मविआ अडचणीत - Kasba Peth by election

विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या पुण्यातील दोन पोटनिवडणुकीच्या जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष आणि बेबनाव भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्ह व्यक्त केली जात आहेत. आजपासून पुण्यात प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत.

Pimpri Chinchwad By Election
Pimpri Chinchwad By Election
author img

By

Published : Feb 11, 2023, 4:48 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पुण्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पकड आहे. पुण्यातील काही हक्काचे मतदारसंघ पवार यांच्या राजकारणात होती फिरत असतात. विशेषतः पिंपरी चिंचवड हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड भाजपच्या हातात गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. याला कारणीभूत लक्ष्मण जगताप यांनी केलेले पक्षांतर हे आहे.

कसबा पेठ मतदारसंघात पेच : कसबा पेठ मतदार संघातल्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असला तरी हेमंत रासने यांना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान आहे. नव्या मधील अंतर्गत संघर्ष आणि त्याचा फटका जर धंगेकर यांना बसला नाही तर ते रासने यांना जोराची टक्कर देतील अशी परिस्थिती आहे तर टिळकांना उमेदवारी न दिल्याचा फटका रासने यांनाही बसू शकतो. प्रचारात सध्या धंगेकर यांनी आघाडी घेतली असून पुण्यातील विविध प्रश्नांसोबतच शिंदे फडणवीस सरकारच्या अपयशाबाबत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे

मविआ संघर्षाचा फटका चिंचवडमध्ये : चिंचवड मतदार संघात लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी अश्विनी जगताप या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वास्तविक ही जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. असे, असले तरी शिवसेनेचे राहुल कलाटे हे सुद्धा रिंगणात उभे आहेत. त्यांची मनधरणी करण्यात शिवसेनेला अपयश आले. त्यामुळे मग यातल्या अंतर्गत संघर्षाचा फटका काटे यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहुल कलाटे यांचा गेल्या निवडणुकीत 38 हजार मतांनी लक्ष्मण जगताप यांनी पराभव केला होता. त्यामुळे आता पुण्यात पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड मतदार संघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला काटे यांच्या रूपाने शिरकाव करता येतो की अश्विनी जगताप आपली जागा कायम राहतात. हे, पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता माविआ मधील संघर्षामुळे आणि सहानुभूतीची मदत मिळाल्याने जगताप यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस विशेषता पवारांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे या मतदारसंघातील संघर्ष अधिक तीव्र होत. जाणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे.

भाजपा, राष्ट्रवादीचे दिग्गज पुण्यात करणार प्रचार : भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार यांनी कसबा आणि चिचवडच्या पोटनिवडणूकीत प्रचारासाठी ठाण मांडले आहे. अनेक स्टार प्रचारक येथे लवकरच सभा घेणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेसच्यावतीने अनेक नेते मतदारांना अवाहन करण्यासाठी दाखल होणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी याची तयारी चालवली असून लवकरच परस्पारांच्या तोफा धडाडताना दिसणार आहे.

हेही वाचा - Ravikant Tupkar Self Immolation : रविकांत तुपकर यांनी केला आईसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न; ओतले अंगावर पेट्रोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.