पुणे: या भेटीनंतर नाना पटोले म्हणाले की, मी आमच्या संस्काराच्या गोष्टी बोललो. आमच्या उमेदवारांच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन चर्चा केली आणि हीच पद्धत आहे. मी आणि खासदार गिरीश बापट आम्ही विधानसभेत एकत्र काम केले आहे. ते आमचे मित्र आहे. मैत्रीत पक्ष बघत नाही. आमचे मित्र आजारी असेल तर त्याची विचारपूस करणे, तो लवकर बरा व्हावा, यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करणे, हे आमचे संस्कार आहे. मी माझ्या मित्राला सदिच्छा भेट दिली आहे.
निवडणुकीवर चर्चा नाही : या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारला असता ते म्हणाले की, निवडणुकीवर कोणतीही चर्चा या भेटीत झालेली नाही. खासदार गिरीश बापट यांनी 5 वेळा कसबा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे आणि योगायोगाने मी आज कसबा मतदार संघातील अर्ज भरण्यासाठी आलेलो होतो. आज आम्ही भेट घेतली आहे, असेही यावेळी नाना पटोले म्हणाले.
हिंदू महासंघाकडून आनंद दवेंचा उमेदवारी अर्ज : भाजपाकडून शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ब्राह्मण मतदार जास्त असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदू महासंघाकडून आनंद दवे हे निवडणूक अर्ज भरणार आहेत. आरक्षणाच्या बाहेरचा ओबीसी समाज त्याच बरोबर खुला प्रवर्ग आणि ब्राह्मण समाजाची मतदार संख्या लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले आहे. कडवा हिंदुत्ववाद जपण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, असे उद्गार दवे यांनी काढले.
आनंद दवे यांची प्रतिक्रिया : हिंदू महासंघाचे आनंद दवे आणि इतर पदाधिकाऱ्याने आज नाराज असलेले शैलेश टिळक यांची भेट घेतलेली आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पण ती मिळाली नाही. त्यामुळे ब्राह्मण मतदार ही नाराज झाले असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. हिंदू महासंघाने ही भेट घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही मुक्ताताईचे आणि शैलेश टिळकांचे आशीर्वाद घेतले. यानंतर उमेदवारी अर्ज भरणार दाखल केला, अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली.
खुल्या प्रवर्गातील मतदार आमच्यासोबत : कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हेमंत रासने हे पाच वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. परंतु पाच वर्षांत कसबाला काही भेटले नाही. कसबामध्ये कुठलाही विकास झाला नाही. त्यामुळे कसबा मतदारसंघातील मारवाडी समाजाची, ब्राह्मण समाजाची आणि खुल्या प्रवर्गाची मतदार संख्या आहे ती आमच्या पाठीशी उभे राहतील. हिंदू महासंघ या ठिकाणी निवडून येईल, अशी अपेक्षासुद्धा आनंद दवे यांनी यावेळी व्यक्त केली. मतदार मोठ्या प्रमाणात आम्हाला स्वीकारतील. त्यामुळे आम्ही आज शैलेश टिळक यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. उद्या आम्ही उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली आहे.
मतभेदाच्या बातम्या चुकीच्या : काँग्रेसमध्ये मतभेद असल्याच्या चुकीच्या बातम्या काँग्रेसकडून, भाजपाकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत असं कितीही केलं तर काही फरक पडत नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कायमस्वरूपी नसते जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आज आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी उमेदवारी भरायला आणि आंदोलनाला आहोत यावरूनच काँग्रेस एकसंघ असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे.
घरातले भांडण आम्ही घरातच मिटवू : ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना नाना म्हणाले की, आमच्या घरातले भांडण आम्ही घरातच मिटवू. भाजपमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे कसब्यातसुद्धा आम्ही जिंकून जनतेतून तुम्हाला उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भाजप विनंती करत आहे; परंतु माध्यमातून अशा गोष्टी होत नसतात एक संस्कृती आहे, ती गोपीनाथ मुंडेपासून आम्ही चालू केली. परंतु, भाजप नसती मोडीत काढली त्यामुळे मी स्वतः पोटनिवडणुकीसाठी घरी जाऊन त्यांना भेटलो. परंतु आमच्यापर्यंत कोणी आले नाही. माध्यमात आणि फोनवरून अशी चर्चा होत नाही, असेसुद्धा नाना पटोले यांनी भाजपला सुनावले.
भाजपचा पराभव अटळ: येत्या 48 तासांमध्ये आम्ही उमेदवार बदलतो. तुम्ही कसबा बिनविरोध होण्याची ग्वाही द्या, अशी मागणी भाजप करत आहे. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाला पराभव समोर दिसताना हे सुचलं का? कारण सकाळी फोनवर बोलणे झाले आणि उमेदवारी दुपारी तुम्ही जाहीर केली. आमच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केले नाही. त्यामुळे पराभव अटळ आहे हे त्यांना दिसत असल्यामुळे अशी भाषा भाजपकडून होत असल्याची टीका नाना पटोले यांनी केलेली आहे.
एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन : पुण्यामध्ये आज काँग्रेसच्यावतीने आज आणि अदानीचे शेअर्स घेतलेल्या एलआयसी कंपनीच्या कार्यालयासमोर आघाडीची चौकशी व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे त्याचबरोबर काँग्रेसचे शहर पदाधिकारी यांनी केले.
ब्राह्मण समाज आक्रमक: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोट निवडणुकीत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी देण्यात येणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, भाजपकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आला आहे. रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर कसबा मतदारसंघातील ब्राह्मण समाज हे नाराज झाले आहे. आज समाजाच्या काही लोकांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन शैलेश यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत कसबा पोट निवडणुकीत आम्ही ब्राह्मण समाज एकतर नोटाला मतदान करून नाहीतर आमचा उमेदवार जाहीर करू, अशी भूमिका त्यांनी घेतली.