ETV Bharat / state

कऱ्हा नदीला पूर, बारामती तालुक्यात जनजीवन विस्कळीत

नाझरे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.धरणातून १५ हजाराचा विसर्ग कऱ्हा नदीत सोडण्यात आला आहे. तसेच बारामती तालुक्यातील आठ मंडळात एक हजार पेक्षा अधिक मिलीमीटर पाऊस झाला आहे. ग्रामीण भागातील ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. एक हजार ५०० पेक्षा अधिक घरात पुराचे पाणी शिरले होते. पुरबाधित नागरिकांना शाळा, मंगलकार्यालये या ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुरात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे तहसील प्रशसनाने सांगितले आहे.

बारामती
Karha river Flooding in Baramati
author img

By

Published : Oct 16, 2020, 7:42 AM IST

बारामती- पुण्यात पावसाने थैमान घातले आहे. नाझरे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कऱ्हा नदीत सोडण्यात आला आहे. तसेच बारामती तालुक्यातील आठ मंडळात एक हजार पेक्षा अधिक मिलीमीटर पाऊस झाला आहे. ग्रामीण भागातील ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. एक हजार ५०० पेक्षा अधिक घरात पुराचे पाणी शिरले होते. पुरबाधित नागरिकांना शाळा, मंगलकार्यालये या ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुरात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे तहसील प्रशसनाने सांगितले आहे.

बारामती तालुक्यातील आठ मंडळात १ हजार ३० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये १७० बारामती, १३८ माळेगाव, १०९ पणदरे, १३० वडगाव निबाळकर, १०७ लोणीभापकर, १०६ मोरगाव, १४० सुपा, १३० उंडवडी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार झालेल्या पावसामुळे बारामती शहराचा संपर्क तुटला होता. पावसामुळे मोरगाव, नीरा, पाटस, फलटण रस्ते बंद झाले होते. नदीकाठच्या गावांसह बारामती शहराला सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - सोलापूर महापूर भीषणता:14 जणांचा मृत्यू;570 गावे उद्धवस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.