ETV Bharat / state

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद.. 31 डिसेंबरला परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज - पुण्यात पुन्हा एल्गार परिषद

पुण्यात पुन्हा एकदा एल्गार परिषदेचे आयोजन करण्याची तयारी करण्यात आली आहे. या परिषदेसाठी पुणे पोलिसाकडे परवानगी मागण्यात आली आहे. तसेच २०१७ च्या एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर परवानगी न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी आयोजकांनी केली आहे.

Elgaar Parishad in pune
पुण्यात पुन्हा एल्गार परिषद..
author img

By

Published : Dec 23, 2020, 12:19 PM IST

पुणे - २०१७ च्या एल्गार परिषदेप्रमाणे यंदाही पुण्यात पुन्हा एल्गार परिषद भरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 31 डिसेंबरला या एल्गार परिषद आयोजन करण्याच्या हेतूने परवानगी मिळावी, यासाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आला आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी ही परिषद भरवण्यासाठी पुण्यातल्या स्वारगेट पोलीस स्टेशनकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन-

ही परिषद भरवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील यांच्या पुढाकाराने निवृत्त शासकीय अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या परिषदेच्या नियोजना संदर्भांत नुकतीच साने गुरुजी स्मारकाच्या आवारात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. ही परिषद गणेश कला क्रीडा रंगमंच येथे घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यानुसार नोंदणी करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडे त्याबाबतची परवानगी मागण्यात आली आहे.

तर उच्च न्यायालयात धाव-

जातीयवाद, दडपशाही आणि हुकूमशाही विरोधात लढणारे वक्ते या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. दरम्यान गेल्या वेळेचा अनुभव पाहता पोलीस या परिषदेला परवानगी देणार का? याबाबत साशंकता आहे. मात्र जर परवानगी नाकारण्यात आल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

२०१७ मध्ये झाली होती यापूर्वीची परिषद-

३१ डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यातील शनिवार वाड्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचारला एल्गार परिषदेची किनार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच यात माओवाद्यांचा सहभाग असल्याचेही आरोप करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले आहे.

२०१७ च्या एल्गार परिषदेप्रकरणी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हॅनी बाबू , सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी व मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा एल्गार परिषद प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.