ETV Bharat / state

शिरुरमध्ये जिल्हा परिषद सदस्यासह दोघांवर अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल

गावांगावांमध्ये सावकारकीचा अवैध धंदा सुरु आहे. गावातीलच एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सावकराने त्याच्याच गावातील माणसाला कर्जाची परतफेड न केल्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

अवैध सावकारी करून दीपक पाचर्णे यांना पैशांची मागणी करणारा पुणे जिल्हा परिषदेचा राष्ट्रवादी कॉग्रेसचा सदस्य राजेंद्र जगदाळे
author img

By

Published : Jul 9, 2019, 9:03 AM IST

Updated : Jul 9, 2019, 9:13 AM IST

पुणे- गावांगावांमध्ये सावकारकीचा अवैध धंदा सुरु आहे. आता या धंध्यात राजकीय नेतेही शिरले असून त्यामुळे जनतेचे शोषन होत आहे. असाच एक प्रकार शिरूर तालुक्यातील कर्डे गावात घडला आहे. यात गावातीलच एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सावकराने त्याच्याच गावातील माणसाला कर्जाची परतफेड न केल्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

शिरुर पोलीस स्टेशन चे दृष्य

याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यासह प्रभुल लुंकड आणि शशांक प्रभुल लुंकड या तिघांवर दीपक रामदास पाचर्णे (रा. कर्डे, ता. शिरूर) यांच्या तक्रारीवरून अवैध सावकारकीचा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. दीपक व त्यांचे बंधू सुधीर यांनी गावातील सावकार प्रभुल लुंकड यांच्याकडून दहा टक्के प्रति महिना व्याजदराने सात लाख रूपये घेतले होते. त्यासाठी पाचरने यांनी वीस गुंठे जमिनीचे खरेदीखत लिहून दिले होते. आतापर्यंत या कर्जावर सहा लाख रूपये व्याज आणि जमीन दिलेली होती. उरलेले पैसे फेडणे शक्य न झाल्याने लुंकड यांनी हे कर्ज राजेंद्र जगदाळे यांच्या पैशातून दिल्याचे सांगितले. मात्र, आता राजेंद्र जगदळे आणी लुंकड यांना त्यांचे पूर्ण पैसे हवे आहेत. एकून १७ लाख रूपये मिळेपर्यंत जमीन परत दिली जाणार नसल्याचे त्यांनी पाचर्णे यांना सांगितले आहे. या दोघांनी इथवरच न थांबता पाचार्णे यांच्या घरी जाऊन त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादी ने तक्रारीत म्हटले आहे.

सावकाराच्या माणसांनी उचलून नेऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याने व त्यांच्या त्रासाला कंटाळून पाचर्णे यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्यासह दोघांवर अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Intro:Anc__गावांगावांमध्ये सावकारकीचा गोड धंदा सुरु असताना राजकिय नेतेच सावकार बनायला लागले असताना
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्यासह प्रभुल लुंकड आणि शशांक प्रभुल लुंकड या तिघांवर दीपक रामदास पाचर्णे (रा. कर्डे, ता. शिरूर) यांच्या तक्रारीवरुन अवैध सावकारकीचा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे

दीपक व त्यांचे बंधू सुधीर यांनी गावातील सावकार प्रभुल लुंकड यांच्याकडून दहा टक्के प्रति महिना व्याजदराने सात लाख रूपये घेतले होते. त्यासाठी वीस गुंठे जमिनीचे खरेदीखत लिहून दिली होती. आतापर्यंत या कर्जावर सहा लाख रूपये व्याज आणि जमीन दिलेली होती. उरलेले पैसे फेडणे शक्य न झाल्याने लुंकड यांनी हे कर्ज राजेंद्र जगदाळे यांच्या पैशातून दिल्याचे सांगितले. तसेच सतरा लाख रूपये देईपर्यंत जमीन परत दिली जाणार नाही असे सांगुन जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे आणि लुंबड यांनी दिपक पाचार्णे यांच्या घरी येऊन जिवे मारण्याची धमकी दिली, असे या तक्रारीत म्हटले आहे.

सावकारांच्या माणसांनी मला उचलून नेऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून पाचर्णे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असेगी फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.त्यानुसार जिल्हा परिषद सदस्यासह दोघांवर अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेBody:...Conclusion:
Last Updated : Jul 9, 2019, 9:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.