ETV Bharat / state

Jayant Patil On NCP MLA: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच आमदार आमच्या संपर्कात - जयंत पाटील - राकॉं आमदाराबद्दल जयंत पाटील

Jayant Patil On NCP MLA : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत देखील पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही गटांकडून आमदार आमच्याच संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. अशात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Sharad Pawar group NCP state president) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सर्वच आमदार हे (dispute over party and symbol in NCP) आमच्या संपर्कात आहेत, असं सांगितलं आहे. प्रत्येक आमदार (NCP MLA) आता सांगत आहे की, झालं ते चुकीचं झालं आहे. आम्ही तुमच्याच बरोबर असल्याचं राकॉंचा प्रत्येक आमदार ग्वाही देत असल्याचं यावेळी पाटील म्हणाले.

Jayant Patil On NCP MLA
जयंत पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 5:50 PM IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांबाबत जयंत पाटील यांचे मत

पुणे Jayant Patil On NCP MLA : लाईफ संस्थेच्या वतीने लाईफ स्मृती सन्मान पुरस्काराचं आयोजन पुण्यातील नीतू मांडके सभागृहात करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

तर पक्ष स्थापनेच्या भानगडीत कोणी पडणार नाही : यावेळी येत्या 6 तारखेला निवडणूक आयोगासमोर होत असलेल्या सुनावणी बाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, अनेक तर्क सुनावणी बाबत लावले जात आहेत. भारताच्या इतिहासात पक्षाचा संस्थापक जिवंत असताना त्यांनाच बाहेर काढण्याचा निर्णय काही लोक बसून घेत आहेत. त्यातही पक्ष आमच्याकडे असल्याचा आविर्भाव कोणी मांडत असेल तर याबाबत राजकीय पक्ष पळवून किंवा चोरण्याची पद्धत सध्या नव्याने सुरू झालेली दिसेल. आम्हाला विश्वास आहे की, निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. आमदार गेले की पक्ष जातो, अशी परिस्थिती झाली तर कोणताही राजकीय व्यक्ती पक्ष काढण्याच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उद्याच्या 6 तारखेच्या सुनावणीमध्ये समोर येतील आणि एका सुनावणीमध्ये हे संपणार नाही, असं यावेळी पाटील म्हणाले.

शासनाचा ओबीसींवर अन्याय : ओबीसी आरक्षणाबाबत पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी सर्वांची भूमिका आहे. मंत्रालयात जागा भरताना काही ओबीसीच्या जागा रिक्त असेल आणि ज्यांना जागा मिळालेल्या नसतील तर ते तपासण्यात यावे. असे असेल तर ओबीसींवर हे सरकार अन्याय करत आहे. तसेच जातनिहाय सर्वेक्षण व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. पण हे सरकार ते करत नाही, असं यावेळी पाटील म्हणाले.

हे सरकारच काँट्रॅक्टवर असल्याची टीका : नायब तहसीलदार हे पद महत्त्वाचं आहे. अनेक निर्णय या पदावरून होतात. पण जर अशा कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असेल तर ते चुकीचं आहे. मुळात हे सरकारच काँट्रॅक्टवर असल्याची टीका यावेळी जयंत पाटील यांनी केली. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या बाबतीत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकर निर्णय घेतला पाहिजे. पण ते घेत नाहीत हे ठरवून होत आहे; पण त्यांनी लवकर हा निर्णय केला पाहिजे.

सरकार त्यांना परवानगी देईल : दसरा मेळाव्याच्या बाबतीत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मैदानावर सभेची परवानगी मिळाली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्ष त्या ठिकाणाहून सभा घेत आहेत आणि सरकार त्यांना परवानगी देईल, असा विश्वास आहे असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा:

  1. Sanjay Raut on Dasara Melava : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? दसरा मेळाव्यावरुन राऊतांचा हल्लाबोल
  2. Wadettiwar On OBC Certificate : २८ लाख मराठ्यांना ओबीसीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली; वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट
  3. Rahul Narvekar Foreign Tour : मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांची परदेशवारी रद्द, ठाकरे गटाची 'ती' चाल यशस्वी?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.