ETV Bharat / state

कोरोना प्रभाव :  'त्या' कर्मचाऱ्यांना कंपनीत न येण्याचे आदेश द्या, आयटी कर्मचाऱ्यांची मागणी - corona

कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवडमधील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरात बसून काम करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र, ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असेल त्यांना कंपनीत न येण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत न येण्याचे आदेश द्यावेत, आयटी कर्मचाऱ्यांची मागणी

author img

By

Published : Mar 11, 2020, 5:37 PM IST

पुणे - कोरोना विषाणूंची लागण झालेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. या विषाणूमुळे चिकन व्यवसाय, पर्यटन, आयटीसारख्या अनेक क्षेत्रांवरही मोठा परिणाम बघायला मिळत आहे.

रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत न येण्याचे आदेश द्यावेत, आयटी कर्मचाऱ्यांची मागणी

कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवडमधील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' म्हणजे घरात बसून काम करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र, ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असेल त्यांना कंपनीत न येण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केली आहे. अवघ्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूंमुळे नागरिक हतबल झाले आहेत. देशात याचा प्रादुर्भाव होत असून महाराष्ट्रात ५ रुग्ण बाधित आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी काळजी घेतली जात आहे.

हेही वाचा - कोरोनाची धास्ती : पर्यटन क्षेत्राला दीडशे कोटींचा फटका

पिंपरी-चिंचवडमधील आयटी क्षेत्र असलेल्या हिंजवडी येथील कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर, या परिस्थितीत कंपन्यांनी काय करायला हवं, याबाबत आयटी कर्मचाऱ्यांनी काही मुद्देही अधोरेखित केले आहेत. परंतु, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल म्हणजे ज्या व्यक्तीला ताप, खोकला आणि सर्दी असे आजार होतात, त्यांना कंपनीत न येण्याचे आदेश द्यावेत असे देखील काही महिला कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - खळबळजनक..! मित्रांनीच घोटला मित्राचा गळा.. मृतदेह फेकला नदीपात्रात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.