पुणे (दौंड) - डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील म्होरक्या जेरबंद करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी सुमारे १४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डिझेल चोरी करणाऱ्या टोळीतील म्होरक्यास जेरबंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे.
पथक तयार करण्यात आले
(दि. ३०/०८/२०२१)रोजी दौंड तालुक्यातील मौजे पारगाव हद्दीत सचिन आरूण बोत्रे (रा. पारगाव ता. दौड जि.पुणे) यांच्या ट्रकचे टाकीचे झाकन खोलून त्यातील 500 लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे डिझेल चोरी झाल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवंसे-दिवस ट्रक मधील डिझेल चोरीचे गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले, सहाय्यक फौजदार जयसिंग जाधव, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, विकास कापरे, विशाल जाधव, राहुल गडदे, गणेश भापकर, भारत भोसले, निखिल रणदिवे, मारूती बाराते, यांचे पथक तयार करण्यात आले होते. पोलीस पथकांनी यापुर्वीचे रेकाॅर्ड वरील गुन्हेगारांची माहीती घेण्यास सुरवात केली होती.
ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचे समोर आले
(दि. ०७/१०/२०२१)रोजी पोलीस स्टाफला गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढून इसम राजवीर गजराजसिंग मल्होत्रा, वय 36 वर्षे, सध्या रा गावडेवाडी केसनंद बंगला नं 5, ता हवेली, जि पुणे मुळ रा. दिल्ली यास ताब्यात घेवून त्याच्याकडे डिझेल चोरीबाबत चैकशी केली असता सुरवातीला तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यावेळी त्यास पोलीस खाक्या दाखवल्यावर तो पोपटा सारखा बोलु लागला. त्याने सांगितले की त्याने त्याचे इतर साथीदार 1) कालिया उर्फ बासीर रूत्तम खान, रा वार्ड नं 14 गडरोली मकसाई शहाजापुर मध्य प्रदेश 2) ईशान उर्फ इशक मेव रा 2817 भैरूवाला उजैन मध्य प्रदेश 3) आज्जु उर्फ आशिक हुसेन महम्मद हुसेन रा 231/1जबरान काॅलनी बेगमबाग उज्जैन मध्य प्रदेश 4) फिरोज उर्फ भटटा उर्फ शैकत कालु शहा रा वार्ड न 14 मकसाई गडरोली मोहला साहजापुर मध्ये प्रदेश यांचे मदतीने यवत परिसरामध्ये थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचे समोर आले आहे.
यवत पोलीस स्टेशनने आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी निष्पन्न
राजविर गजराजसिंग मल्होत्रा याने त्याचे साथीदारांसह यवत पोलीस स्टेशन हददीत पारगाव, बोरीपार्धी, वरवंड, कासुर्डी, यवत, वाखारी, या भागात ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचे सांगितले असून आरोपीकडुन यवत पोलीस स्टेशन हददीतील डिझेल चोरीचे 10 गुन्हे उघडकिस आणण्यात आले आहे. सुमारे 1000(एक हजार) लिटर डिझेल, एक गे्र रंगाची इंडिवर जीप नं एम एच 14 ए एल 0001, एक चाॅकलेटी रंगाचा आयशर टेम्पो नं आर जे 40 जी ए 0339 असा एकुण किंमत 14,00,000/- (चैदा लाख रूपये) रूपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. यवत पोलीस स्टेशनने आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी निष्पन्न केली आहे. आरोपींकडून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास मा.पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार जयसिंग जाधव हे करीत आहेत.
हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार