ETV Bharat / state

ज्योतिरादित्य सिंधियांकडून पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची पाहणी

Jyotiraditya Scindia : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात 75 नवीन विमानतळ तयार झाली आहेत, असा दावा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलाय. पुणे विमानतळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन टर्मिनलची पाहणी आज शुक्रवार (12 जानेवारी)रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Jyotiraditya Scindia
ज्योतिरादित्य सिंधियांकडून पुणे विमानतळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 10:34 PM IST

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

पुणे : Jyotiraditya Scindia : दिड महिन्यात देशभरात आमच्या 7 ते 8 टर्मिनल तसेच विमानतळाची तयारी ही झाली आहे. काही दिवसांपूर्वी आयोध्या तसेच तिरूचापल्लीच उद्घाटन झालं. त्यानंतर पुणे आणि कोल्हापूर येथील टर्मिनलच काम अंतिम टप्प्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेने संपूर्ण देशात एक शांखला सुरू आहे. 65 वर्षात देशात 74 विमानतळ देशात होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर 10 वर्षाच्या काळात 75 नवीन विमानतळ तयार झाली आहेत असा दावा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलाय. तसेच, सध्या देशात 149 विमानतळ झाली असून, 2030 पर्यंत देशभरात 200 विमानतळ करण्याचा आमचा संकल्प असल्याचं सांगितल आहे.

शनिवारवाड्यासारखी प्रतिकृती : यावेळी सिंधिया म्हणाले, की फक्त राज्याचे नाही संपूर्ण देशात पुण्याची क्षमता महान आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पुण्याच्या नागरी प्रश्नांच्या संदर्भात आग्रही भूमिका आहे. पुण्याच्या विमानतळावर जो नवीन टर्मिनल बांधण्यात आलं आहे, त्या नवीन टर्मिनलवर आपल्याला या शहराचा इतिहास आणि संस्कृती पाहायला मिळेल. शनिवारवाड्यासारखी प्रतिकृती या नवीन इमारतीला उभारली गेली आहे. एखाद्या वाड्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दीपस्तंभ दिसतो आणि त्यानंतर आमचे मार्गदर्शक शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसतोय. अस एकूणच नवीन आणि पुण्याचं वैभव असलेल नवीन टर्मिनल हे बांधण्यात आलं आहे. याच काम हे अंतिम टप्प्यात आलं आहे. आणि लवकरच पुढील 2 ते 3 आठवड्यात याच उद्घाटन करण्यात येणार आहे असही सिंधिया म्हणालेत.

लवकरचं नवीन इमारतीचे उद्घाटन : पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला आश्वरूढ पुतळा जो उभा राहिला तो माझे पणजोबा आणि शाहू महाराजांनी उभा केल्यामुळे माझी या शहराशी भावनिक नाळ जोडली गेली आहे अशी आठवणही सिंधिया यांनी यावेळी सांगितलीये. पुणे विमानतळाच्या संदर्भात अनेक सूचना मी यावेळेस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या 2 ते 3 आठवड्यात पुण्यातील विमानतळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. तसंच देशात 7 ते 8 नवीन विमानतळ आणि टर्मिनल तयार झाली आहेत असही यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया म्हणालेत.

हेही वाचा :

1 'अटल सेतू'मुळं फेरी बोट चालकांना बसणार फटका? जाणून घ्या कारण

2 भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे बळ मिळो; गोदामाईच्या साक्षीनं पंतप्रधान मोदींचा संकल्प

3 आमची निष्ठा देशासाठी, तर काहींची कुटुंबासाठी; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.