ETV Bharat / state

Minister Chandrakant Patil : शाईफेक प्रकरणी तीन जणांना अटक; समता दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला अटक - Chandrakant patil case 3 arrested

चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर घोषणाबाजी करत शाई फेकण्यात ( inkSlap on Guardian Minister Chandrakant Patil ) आली होती. या प्रकरणी आता चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( case registered against three persons ) आहे. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी देखील व्यक्त केली होती. वक्तव्यामुळे बहुजन समाज दुखावला गेला होता.

Minister Chandrakant Patil
शाईफेक प्रकरणी तीन जणांना अटक
author img

By

Published : Dec 11, 2022, 9:27 AM IST

Updated : Dec 11, 2022, 9:46 AM IST

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक ( inkSlap on Guardian Minister Chandrakant Patil ) केल्या प्रकरणी तीन जणांवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ( case registered against three persons ) करण्यात आला आहे. शनिवारी चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर घोषणाबाजी करत शाई फेकण्यात आली होती. या प्रकरणी आता चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज भास्कर घरबडे समता सैनिक दल संघटक, धनंजय भाऊसाहेब इजगज समता सैनिक दल सदस्य आणि विजय धर्मा ओव्हाळ वंचित बहुजन आघाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नाव आहेत.

शाईफेक प्रकरणी तीन जणांना अटक

वक्तव्यामुळे बहुजन समाज दुखावला : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी देखील व्यक्त केली होती. वक्तव्यामुळे बहुजन समाज दुखावला गेला होता. तसेच, महाविकास आघाडी आक्रमक झाली होती. त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केली. शनिवारी चंद्रकांत पाटील दौऱ्यावर असताना विविध संघटनांनी त्यांना विरोध दर्शविला होता. दरम्यान, चंद्रकांत पाटील हे पदाधिकाऱ्यांच्या घरातून चहा घेऊन परत येत असताना त्यांच्या अंगावर, तोंडावर अचानक शाई फेकण्यात आली. या प्रकरणी तीन जणांना चिंचवड पोलिसांनी जाग्यावर ताब्यात घेतलं होते. त्यांच्यावर चिंचवड पोलिस ठाण्यात भादवी कलम 307, 353, 294, 500, 501, 120 (ब) 34 क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1)/135 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक खराडे हे करीत आहेत.

Last Updated : Dec 11, 2022, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.