पुणे - मकर संक्रातीच्या सणात पतंगाच्या मांजाची विक्री करणाऱ्यांवर कढेर कारवाई करण्याची मागणी सर्व जीव मांगल्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. संक्रातीच्या निमित्ताने पतंग उडविण्यासाठी चिनी मांजा बाजारात आला आहे. या चिनी आणि नायलॉनच्या मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हेही वाचा - 'होय... मी दाऊदला भेटलोय आणि दमही दिलाय'
या चिनी मांजामुळे नागरिक आणि पशूपक्षी जखमी होतात. त्यामुळे या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र, छुप्या पद्धतीने हा मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या आणि पशूपक्षांच्या जीवावर बेतणाऱ्या चीनी मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानने केली आहे. अशा मांजामुळे जखमी होणारे नागरिक, पशूपक्ष्यांच्या बचावासाठी या संस्थेच्या वतीने 'विद्याप्रमाण रेस्क्यू ऑपरेशन' राबविण्यात येणार असून 31 जानेवारीपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये एक रूग्णवाहिका,पशू वैद्यकीय डॉक्टर आणि सात आठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असेल.