ETV Bharat / state

Infant In Nala : नाल्यात अर्भक सापडल्यानं खळबळ; कुत्र्यांनी तोडले अर्भकाच्या हाताचे लचके

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 2:51 PM IST

Infant In Nala : भोसरी परिसरातील एका नाल्यात नवजात अर्भक आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या अर्भकाच्या हाताचे कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे ही घटना उघडकीस आली. अनैतिक संबंधातून हे अर्भक जन्माला आलं असावं असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Found Infant In Nala
नाल्यात सापडलेलं अर्भक

पुणे Found Infant In Nala : नाल्यात फेकलेल्या नवजात अर्भकाच्या हाताचे लचके कुत्र्यांनी तोडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना भोसरी परिसरात उघडकीस आली आहे. एका नवजात अर्भकाला नाल्यात फेकून ( Found Infant ) दिल्यानं त्याच्या हाताचे लचके कुत्र्यांनी तोडल्याचं इथच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

नाल्यात आढळलं अर्भक : भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बालाजीनगरमध्ये आज सकाळी आठ वाजता नाल्यात एक पुरुष जातीचं अर्भक सापडलं आहे. या अर्भकाच्या अंगावर कपडे नसल्यानं तिथं कुत्र्यांचा वावर वाढला होता. या कुत्र्यांनी अर्भकाच्या हाताचे लचके तोडल्याचं लक्षात येताच, नागरिकांनी तत्काळ भोसरी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. याबाबतची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी एक पथक घटनास्थळी पाठवलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी नाल्यात पडलेल्या अर्भकाला नागरिकांच्या मदतीनं वर काढलं. मात्र तोपर्यंत त्या अर्भकाचा मृत्यू झालेला होता. सध्या पोलीस या अर्भकाला नाल्यात कुणी फेकून दिलं, याबद्दल माहिती घेत असून बाळाच्या आई वडिलांचा शोध घेत आहेत.

तीन दिवसापूर्वी झाला असावा जन्म : नाल्यात अर्भक आढळून आल्यानं घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतलं असून पुढील प्रक्रियेसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे अर्भक मुलाचं असून दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्याचा जन्म झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र या अर्भकाला नाल्यात कुणी फेकून दिलं, तसंच अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या बाळाची हत्या करून नाल्यात फेकलं आहे, किंवा नाल्यात फेकल्यानंतर कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे या बाळाचा मृत्यू झाला आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. डॉक्टरांच्या अहवालानंतरच हे स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Thane Crime : भिवंडीत मृत अवस्थेत 'अर्भक' आढळल्याने परिसरात खळबळ ; अनैतिक संबंधातून जन्म दिल्याचा संशय
  2. Dead Female Infant Found: स्त्री जातीचे मृत अर्भक रुग्णालयाच्या स्वच्छतागृहातील बकेटमध्ये आढळल्याने खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.