ETV Bharat / state

Methane Lab : 'येथे' मिथेनवर सुरुये संशोधन; भारतातील एकमेव लॅब असल्याचा दावा - जागतिक तापमान वाढ

जागतिक तापमान वाढीला (Global warming) कारणीभूत असा मीथेन हा दुसरा महत्वपूर्ण हरित वायू आहे. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेत (Agharkar Research Institute) संशोधक डॉ. मोनाली रहाळकर यांच्या नेतृत्वात भारतातील ही पहिली लॅब अशी आहे, जिथे या मिथेन ( Methane Lab) वर संशोधन केलं जात आहे.

Methane Lab
भारतातील एकमेव लॅब जिथे मीथेनवर केलं जातं आहे संशोधन...
author img

By

Published : Nov 17, 2022, 8:51 PM IST

पुणे: जागतिक तापमान वाढीला (Global warming) कारणीभूत असा मीथेन ( Methane Lab) हा दुसरा महत्वपूर्ण हरित वायू आहे. तो कार्बनडाय ऑक्सीडपेक्षा २५ पट अधिक सूर्याची उष्णता रोखून धरतो. त्यामुळे मीथेनचे प्रमाण कमी कसे होईल यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. भारतात देखील या मीथेन खाणाऱ्या जीवाणूंवर संशोधन सुरू आहे. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेत (Agharkar Research Institute) संशोधक डॉ. मोनाली रहाळकर यांच्या नेतृत्वात भारतातील ही पहिली लॅब अशी आहे जिथे या मिथेनवर संशोधन केलं जात आहे.

भारतातील एकमेव लॅब जिथे मीथेनवर केलं जातं आहे संशोधन...

मीथेन खाणारे जीवाणू- मीथेनच्या मानवनिर्मित स्रोतांपैकी भात शेतीमधून त्याचे प्रमाण कमी कसे होईल यासाठी डॉ. मोनाली रहाळकर प्रयत्नशील आहेत. या कामाची बीजे त्यांच्या पीएचडीच्या संशोधनांमधून पेरली गेली. त्यांनी जर्मनीमधील संशोधन तेथील कॉन्स्टान्झ सरोवरामधील मीथेन खाणारे जीवाणू या विषयावर केले. मीथेनचे ऑक्सिकरण करणाऱ्या जीवाणूंचा पर्यावरणाला होणाऱ्या उपयोगाचे महत्व त्यांनी जाणून भारत आल्यावर भातशेतीमधील मीथेन खाणाऱ्या जिवाणूंना शुद्ध रूपामध्ये कल्चर करण्यास प्रारंभ केला. आज त्यांच्याकडे ७० विविध मीथेन खाणारी कल्चर आहेत. यापैकी त्यांनी ३ जाती (जिनस) आणि अनेक प्रजाती (स्पिशिस) चे प्रथम वर्णन आणि वर्गीकरण केल्या आहेत. हे जिवाणू प्रामुख्याने मीथेनवरच जगतात. त्यामुळे त्यांचे संवर्धन (कल्चर) करणाऱ्या प्रयोगशाळा जगात हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत.

काय आहे प्रकल्प - भारतात यावर काम करणाऱ्या डॉ. मोनाली रहाळकर या पहिल्या संशोधिका आहेत. त्यांची प्रयोगशाळा मीथेन खाणाऱ्या जिवाणूंना कल्चर रूपामध्ये आणण्यामध्ये अग्रगण्य आहे. आता या जातींचा उपयोग करून भात शेतीमधून बाहेर पडणारा मीथेन कमी कसा होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. या मधील काही जिवाणू हवेतील नायट्रोजनचे रूपांतर झाडांना शोषून घेताये ईल अश्या स्वरूपात रूपांतर करतात.

डॉ. मोनाली रहाळकर पुण्यातील आघारकर अनुसंधान संस्थान (Agharkar Research Institute) इथे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ म्हणून २०१३ पासून कार्यरत आहेत. आणि तेव्हा पासून त्यांनी आघारकर संस्थेत भारतातील पहिली लॅब सुरू केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था असलेल्या पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील (एआरआय) शास्त्रज्ञांनी मिथेनोट्रोफिक जीवाणूंचे 70 विविध प्रकार वेगळे केले असून, ते भाताच्या झाडांपासून मिथेनचे उत्सर्जन कमी करण्यास सक्षम असल्याचे आढळून आले आहे.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ जनरल अँड मॉलिक्युलर मायक्रोबायोलॉजी या इंटरनॅशनल जर्नल ऑफ जनरल अँड मॉलिक्युलर मायक्रोबायोलॉजीमध्ये अँटोनी व्हॅन लीवेनहोक या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कार्यात त्यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील देशी मिथेनोट्रोफ्स, मुख्यत: तांदळाच्या शेतातील माती आणि गोड्या पाण्यातील चिखलापासून वेगळे केले आणि पश्चिम भारतातील तांदळाच्या शेतातून दोन नवीन वंश आणि मेथेनोट्रॉफच्या सहा नवीन प्रजातींचे दस्तऐवजीकरण केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.