पुणे : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील आज पुण्यातून राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारासपासून ते बेपत्ता झाल्याचे समजत आहे. याबाबत पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसात तक्रार दाखल : मिळालेल्या माहितीनुसार केदार जाधव याचा परिवार कोथरूड भागात गेल्या कित्येक वर्षापासून राहायला आहे. त्याचे वडील महादेव जाधव यांनी आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घराखालून रिक्षा घेऊन गेले. मात्र, आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्याजवळ असलेला फोन सुद्धा बंद लागत आहे. त्यामुळे घरच्यांकडून पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महावितरणात दिली आहे सेवा : क्रिकेटपटू केदार जाधवचा जन्म 26 मार्च 1985 रोजी पुण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव हे महादेव जाधव आहे. केदार जाधव मूळचा सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील जाधववाडी येथील आहे. दरम्यान, महादेव जाधव हे १९८० साली सोलापुरातून पुण्यात स्थायिक झाले होते. महादेव जाधव यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपिक पदाची सेवा बजावली आहे.
घरी परतलेच नाही : क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव जाधव हरविल्यामुळे खळबळ उडाली आहे. केदारचे वडिल २००३ साली सेवानिवृत्त झाले आहेत. आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले, त्यानंतर घरी परतलेच नाही. याप्रकरणी केदारच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
केदार जाधव रणजीत चर्चेत : केदार जाधव बराच काळ मैदानापासून दूर आहे. केदारने काही दिवसांपूर्वी आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाली होती. केदार जाधव याची फलंदाजी सर्वांसाठी चर्चेचा विषय बनली होती. केदारने त्या एकदिवसीय शैलीत फलंदाजी करताना 283 चेंडूत 283 धावा केल्या होत्या. केदारने या खेळीत 21 चौकार आणि 12 षटकार मारल्यामुळे महाराष्ट्र मजबूत स्थितीत पोहोचला होता. केदार जाधवने बऱ्याच कालावधीनंतर एवढी मोठी खेळी केली होती.
हेही वाचा : Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडवणीस ब्लॅकमेल प्रकरण; अनिक्षाला जामीन तर अनिल जयसिंघानीला कोठडी