ETV Bharat / state

Pune Feta Tying Records : तब्बल ४०३ महाराष्ट्रीयन फेटे बांधून साकारला 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' - इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस

पुण्यात 403 महिला व पुरुषांनी फेटे बांधून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये आपले नाव नोंदविले आहे. 'महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन'तर्फे या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसह उपस्थितांनी राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश देखील दिला.

Pune Feta Tying Records
महाराष्ट्रीयन फेटे
author img

By

Published : Aug 13, 2023, 9:56 PM IST

महाराष्ट्रीयन फेटे बांधण्याच्या विक्रमाविषयी माहिती देताना पदाधिकारी

पुणे: 'भारत माता की जय...'च्या जयघोषात तब्बल ४०३ महिला व पुरुषांनी फेटे बांधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा विक्रम 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये नोंदविला आहे. 'महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन'तर्फे या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांसह उपस्थितांनी राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश देखील दिला.

येथे पार पडला विक्रम: डेक्कन जवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हा विक्रम करण्यात आला. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'च्या पुणे विभागाच्या प्रमुख डॉ. चित्रा जैन यांनी असोसिएशनच्या संस्थापिका अभिलाषा बेलवे यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी असोसिएशनच्या अपूर्वा पाटकर, विजया वाटेकर, गायत्री अकोलकर, सविता पवार, आरती कुटुंबे, प्रमुख पाहुण्या डॉ. प्रीती देशमुख आणि डॉ. प्रेरणा बेराकी यांसह इतरही सदस्य उपस्थित होते.

59 मिनिटात 403 फेटे बांधले: चित्रा जैन म्हणाल्या, एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा विक्रम 'महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन'ने पुण्यामध्ये केला आहे. तब्बल ४०३ फेटे अवघ्या ५९ मिनिटांमध्ये बांधण्यात आले आहेत. या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश देखील देण्यात आला. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांना एकत्रित करून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा आगळावेगळा उपक्रम होता.

मराठमोळ्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश: अभिलाषा बेलवे म्हणाल्या, प्रत्येकाला ११ ते १३ फूट लांबीचा फेटा घालण्यात आला. फेटे बांधण्याकरिता ६ पुरुष कारागिर होते. पुण्यासह मुंबई, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नगर यांसह विविध शहरांतून नागरिक सहभागी झाले होते. मराठमोळ्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासोबतच राष्ट्रभक्ती प्रत्येकामध्ये रुजावी, याकरिता हा विक्रम करण्यात आला. याशिवाय दोन दिवसीय राखी व फेस्टिव एक्झिबिशनचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यापूर्वीही महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि विशेष करून पुण्यात विविध विक्रमांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळेच पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते.

हेही वाचा:

  1. Youngest To Solve Rubik Cube : 6 वर्षीय क्यूब मास्टर!, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नोंद
  2. अमेरिकेतही विक्रम! संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वातील योग कार्यक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
  3. Guinness World record In Coding : 12 वर्षांच्या मुलाचे कोडिंगमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.