ETV Bharat / state

Abhijit Bichukale On Kasaba By Election : माझ्या मागणीचा विचार केला नाही, मात्र मतदारांनी मतदान करावे - अभिजीत बिचुकले

कसबा पोटनिवडणुकीत ज्या प्रकारे पैसे वाटले, उमेदवाराने आरोप प्रत्यारोप केले. त्यानंतर मी ही एक उमेदवार म्हणून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती, परंतु आयोगाने माझ्या मागणीचा विचार केला नाही, आता निवडणूक होतच आहे. तर सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी मतदारांना केले आहे.

author img

By

Published : Feb 26, 2023, 1:45 PM IST

Abhijit Bichukale
अभिजीत बिचुकले
अभिजीत बिचुकले

पुणे : अभिजीत बीचुकले यांनी आजपर्यंत खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अनेक निवडणुका लढवल्या आहेत. वरळीत देखील आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यात चांगली निवडणुक वरळीमधली होती. असे अभिजित बिचुकले म्हटले आहे. कसबा पोटनिवडणूकीत काही किड्या मुंग्या आलेल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक खराब झाली आहे. असे बीचुकले म्हणाले आहेत.

कसबा पोट निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देशाचे गृहमंत्री अनित शाह प्रचाराला आले होते. त्याबद्दल ते म्हणाले की मला त्यांची गरज नाही. त्यांना गरज होती त्यांना आव्हान होते. मला नाही त्यामुळे, मला काही घाबरण्याची गरज नाही असे, सुद्धा बीचुकले म्हणाले आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजप उमेदवाराने आणि भाजप पक्षातील नेत्यांनी लोकांना पैसे वाटले असा आरोप महाविकास अघाडीच्या उमेदवाराने केला होता. निवडणूक आयोगाने त्यावर काहीच कारवाई का केली नाही असे विचारले असता. त्या कायदेशीर प्रक्रियेसाठी मी परत आयोगाकडे जाईल परंतु आयोगाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असल्याने काहीच करू शकत नाही. परंतू मतदाराने बाहेर येऊन मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा अभिजीत बीचुकले यांनी केले आहे.

प्रलोभनांना बळी पडणे थांबवले पाहिजे : कसबा पोट निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मुख्य उमेदवार जे होते ते हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. या सगळ्या उमेदवारांमध्ये चर्चेत असलेल्या चेहरा म्हणजे अभिजीत बीचुकले आहेत. ते सेलिब्रिटी उमेदवार म्हणून पुण्यात त्यांची या निवडणुकीमध्ये खूप मोठी चर्चा झाली आहे. त्यामुळे मी आज नाहीतर उद्या निवडून येईल. परंतु माझे सेलिब्रिटी नाव कधीच कोणी काढू शकणार नाही असे सुद्धा अभिजीत बीचुकले यांनी म्हटलेले आहे. लोकांनी प्रलोभनांना बळी पडणे थांबवले पाहिजे आणि लोकांनी अतिशय स्वतंत्रपणे मतदान करणे गरजेचे असल्याचे बीचुकले यांनी म्हटले आहे.

नागरिकांचे मोठ्या संख्येने मतदान : कसबा पोटनिवडणूकीसाठी सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने मतदान करत आहेत. सकाळपासूनच विविध बूथवर नागरिक मतदानासाठी मोठी गर्दी करत आहेत. अशात कसबा मतदार संघातील अमृता देवकर या थेट लंडनहून मतदानासाठी पुण्यात आल्या आहेत. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नागरिक सकाळपासून रांगेत आहेत. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा कालपासून सज्ज झाली होती. प्रत्येक बूथवर मोठ्या प्रमाणावर पोलीसांच बंदोबस्त पहायला मिळत आहे.

हेही वाचा : Kasba By Election: कसबा पेठ मतदारसंघ निवडणूक; मतदानासाठी लंडनहून गाठले थेट पुणे..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.