पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एक धक्कादायक घटना ( shocking incident in Wagholi area ) घडली आहे. चोरीचा आळ घेऊन महाविद्यालयीन युवतीबरोबर अश्लील कृत्य ( Indecent act with college girl ) करुन पोलिसात देण्याची धमकी देऊन तिच्याकडील 80 हजार रुपये काढून घेतले आहे. युवतीने याबाबत हरियाणा पोलिसांकडे तक्रार ( Complaint to Haryana Police ) दिल्यानंतर संबंधित गुन्हा हरियाणा पोलिसांनी लोणीकंद पोलिसांकडे तपासासाठी पाठविला आहे.
पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल : याबाबत हरियाणामधील सिरसा जिल्ह्यातील एका महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेथून तो गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्यात आला आहे. याप्रकरणी दोन तरुणी व तीन तरुण अशा पाच जणांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या राज्यातील राहणारे असून एकाच महाविदयालयात शिकत आहेत.
असा घडला प्रकार : फिर्यादीची मुलगी वाघोलीतील एका इन्स्टिट्युटमध्ये शिक्षण घेत आहे. वाघोली भागात फ्लॅट भाडेतत्वावर घेऊन ती आरोपी दोन तरुणींसोबत राहत होती. 17 ऑक्टोबर रोजी त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. त्यामुळे तिने फ्लॅट सोडला. ती शेजारी राहणार्या मुलींबरोबर राहु लागली. त्यावेळी आरोपी तरुणी व तरुणांनी युवतीला धमकावण्यास सुरुवात केली. युवतीचे कपडे उतरवून तिला मारहाण केली. या प्रकाराचे त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले. त्यानंतर पोलिसात देण्याची धमकी देऊन युवतीच्या खात्यातील 80 हजार रुपये आरोपींनी स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. त्यानंतर तिला आरोपी धमकावत होते. त्यामुळे युवती घाबरली आणि मूळगावी निघून गेली. तिने आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पीडीत युवतीच्या आईने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांचा अद्याप संपर्क झालेला नाही. इतर देखील माहिती घेऊन पोलिस तपास करत आहेत.