पुणे: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविन्द केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय चलनावर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापा म्हणजे भारताची अर्थव्यवस्था उंचावेल असे वक्तव्य करून (hindu god on indian currency) अंधश्रध्देला चालना देण्याचे काम केले असून त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने पोलिसांना देण्यात आले आहे.
केजरीवालांनी माफी मागावी अशी मागणी: इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान, अब्दुल बागवान, राजू सय्यद, रहिम शेख, रियाज मुल्ला, गफुर सैय्यद, रियाज मोमीन, आयूब मणियार, असलम पठाण, रियाज फिटर, मुन्ना अन्सारी, तौफिक अन्सारी यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटिल यांना हे निवेदन दिले आहे. सुशिक्षित म्हणविणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यांराज्यात धार्मिक भा्वना भडकावण्याचा प्रयत्न केल्याबाबत त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.