दौंड(पुणे)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित उद्योग, साखर कारखाने यांची आज केंद्रीय पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्याची देखील तपासणी या केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे. मात्र ही कारवाई नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात येत आहे याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही .
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दौंड शुगर साखर कारखान्यावर केंद्रीय तपास यंत्रणाचे तपासणी पथक कारखाना स्थळी दाखल झाले आहे. सदर पथकाकडून कारखान्याच्या मुख्य ऑफिस मध्ये चौकशी करण्यात येत आहे. सदर कारखान्याच्या ऑफिसच्या गेटवर सीआरपीएफ जवानांचा पहारा आहे. कारखान्यात आत जाण्यास अथवा बाहेर येण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आय़कर विभागाकडून ही कारवाई केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे.मात्र याबाबत अस्पष्टता आहे.
बारामती काटेवाडीतही तपासणी -
बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी ( दि. ७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे. ईडी अथवा आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एका पॉवरफुल्ल नेत्याच्या नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची या पथकाकडून चौकशी केली जात आहे. काटेवाडीत हा निकटवर्तीय राहतो. दुसरीकडे बारामती एमआयडीसीतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीतही एक पथक पोहोचले आहे. त्यांच्याकडून कंपनीत तपासणी केली जात आहे.
हेही वाचा -भाजप सरकार खुन्यांना का वाचवतय?, संजय राऊतांची लखीमपुर प्रकरणावर प्रतिक्रियाहेही वाचा -