पुणे : पुण्यात आयकर विभागाची मोठी छापेमारी ( Big raid by Income Tax Department in Pune ) करण्यात आली असून, चॉईस उद्योग समूहाच्या (Choice Industry Group ) विभागावर मोठी छापेमारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्याकडून सुरू ( Initiated by Income Tax Officer ) आहे. दिल नामांकित चॉईस ग्रुप हा बांधकाम व्यवसायामध्ये एक महत्त्वाचा उद्योग समूह आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये ज्या भागात प्राईम लोकेशन आहेत, तेथे या ग्रुपचे बांधकाम प्रोजेक्ट सुरू आहेत आणि या ग्रुपचे प्रमुख अशोक अग्रवाल हे आहेत. त्यांच्यावरच पुण्यात आज पहाटेपासूनच आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे.
अधिकाऱ्यांकडून झाडाझडती : आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यात असून या ठिकाणी त्यांचा पोलीस बंदोबस्त सुद्धा पुरवण्यात आलेला असून सकाळपासूनच विभागाचे अधिकारी जे आहे ते छापेमारी करत आहेत. अशोक अग्रवाल यांचे घर ऑफिस कार्यालय आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांचे सब ऑफिस आहे. त्या सर्व ठिकाणी आज अधिकाऱ्यांकडून झाडाझडती करण्यात येत आहे आणि कागदपत्राची पडताळणी सुरू आहे त्यामुळे बांधकाम विभागामध्ये खळबळ माजलेली आहे.
कागद पडताळणी तपासणी सुरू : आयकर विभागाचे अधिकारी तीन वेगवेगळ्या गाड्यांमधून या ठिकाणी आलेले आहेत. खाजगी गाड्यांमधून आयकर विभागाचे अधिकारी सकाळीच या चॉईस ग्रुपच्या कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी त्या ठिकाणची कागद पडताळणी तपासणी सुरू आहे. आयकर विभागाला संशय आहे की, अशोक अग्रवाल यांनी काही आयकर चुकवला आहे. त्या सर्व कागदपत्राची पडताळणी आता अधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे. पुण्यात ही सगळ्यात मोठी छापीमारी समजली जाते.
नातेवाईकांवर सुद्धा आयकर विभागाचे छापे : पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय लोकांच्या जे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर सुद्धा आयकर विभागाचे काही छापे करण्यात आले होते. त्यानंतर आता बांधकाम व्यवसाय कामगार जे व्यावसायिक आहेत. त्यांच्यावरती ही छापीमारी करण्यात आली. गेले अनेक दिवसापासून आयकर विभागाचे अधिकारी या सर्वांच्या तपास करत होते. त्यामुळे हे जे बांधकाम व्यवसायिक विभागाच्या रडारवर आहेत. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु अधिकाऱ्याने आज पहाटेपासूनच 40 ग्रुपवरती छापीमारी करून कागदपत्राची तपासणी सुरू केली आहे.