बारामती - नात्यातील विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी संपत लक्ष्मण ढवळे (रा.शिरसुफळ ता. बारामती) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरसुफळच्या एका वस्तीवर राहणाऱ्या २३ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली. फिर्यादीनुसार दिनांक २ मार्च ते २९ मार्च या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा - खासदार किरण खेर यांना रक्ताचा कॅन्सर, अनुपम खेर यांनी दिला बातमीला दुजोरा
पीडित महिला आरोपीच्या नात्यातीलच आहे. त्याने तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवत कुरकुंभ (ता. दौंड) येथे एका खोलीवर नेले. तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवत इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे पीडिता व आरोपी हे दोघेही विवाहित आहेत. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहेत.
हेही वाचा - मुंबईत जुगार अड्ड्यावर 'एनआयए'चा छापा, मॅनेजरची चौकशी सुरु