ETV Bharat / state

यंदा दहीहंडी फुटणार नाही...सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा मंडळांचा निर्धार - पुणे लेटेस्ट न्यूज

गर्दी टाळण्याच्या उद्देशातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट संचालित सुवर्णयुग तरुण मंडळाने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून महापालिकेच्या कोविड सेंटरला मदत करण्याचे ठरविले आहे, तर शहरातील विविध प्रमुख मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द करून समाजातील विविध क्षेत्रात मदत करण्याचे ठरविले आहे.

यंदा दहीहंडी फुटणार नाही...अनेक मंडळ सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविणार

author img

By

Published : Aug 7, 2020, 5:11 PM IST

पुणे - एकावर एक थर रचून गोविंदांची दहीहंडी फोडण्याची सुरू असलेली लगबग. अत्याधुनिक ध्वनीवर्धक यंत्रणा, प्रकाशझोत, चित्रपटसुष्टीतील तारे-तारकांची उपस्थिती अशा उत्साही वातावरणातील दहीहंडी उत्सव यंदा अनुभवता येणार नाही. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा दहीहंडी उत्सवावरील मोठा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे.

यंदा दहीहंडी फुटणार नाही...अनेक मंडळ सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविणार

शहरातील अनेक गणेश मंडळांकडून गणेशोत्सवाप्रमाणेच दहीहंडी उत्सव दिमाखदारपणे साजरा केला जातो. मंडळातील कार्यकर्त्यांचा संच दहीहंडी उत्सवासाठी राबत असतो. केवळ शहराच्या मध्य भागातच नव्हे तर कोथरूड, कर्वेनगर, बिबवेवाडी, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, हडपसर, वडगाव शेरी आदी उपनगरांमध्येही दरवर्षी दहीहंडी उत्साहाने साजरी होते. कोरोना संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सेवा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. गर्दी टाळण्याच्या उद्देशातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट संचालित सुवर्णयुग तरुण मंडळाने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून महापालिकेच्या कोविड सेंटरला मदत करण्याचे ठरविले आहे, तर शहरातील विविध प्रमुख मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द करून समाजातील विविध क्षेत्रात मदत करण्याचे ठरविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.