पुणे - गावठी कट्टा जवळ बाळगल्याप्रकरणी राजगुरूनगर येथे एका 20 वर्षीय युवकाला पोलिसांनी गावठी कट्ट्यासह अटक केली. शेखर लहू मांजरे असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
पुणे ग्रामीण गुन्हे शाखा पथक आरोपीच्या शोधात राजगुरुनगर शहरात आले होते. त्यावेळी राजगुरुनगर बसस्थानकाच्या आवारात त्यांना एक तरुण संशयितरित्या फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याकडे गावठी पिस्तूल मिळाले. विनापरवाना, बेकायदेशीर पिस्तूल व 1 जीवंत काडतूस आढळल्यामुळे आरोपीला पुढील कारवाईसाठी खेड पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राजगुरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी जवळपास पाच ते सहा जणांना बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू लागली आहे. पोलीस यंत्रणा जेवढी सक्षम झाली आहे त्याच प्रमाणात गावठी पिस्तुल, कट्टे सापडत असल्याने तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. वेळीच छोट्या मोठ्या गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
हेही वाचा - 'हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून दाखवावे'