पुणे - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील भारत बचाओ रॅलीमध्ये सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानतंर देशाभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. यात पुण्यातही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने 'राहुल गांधी' हाय हाय' म्हणत निषेध नोंदविला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानाबाबत सावरकर भवन येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. तसेच, राहुल गांधींनी याप्रकरणी बिनशर्त माफी मागावी अशी मागणीही केली. अन्यथा मतदार म्हणून आम्हाला काँग्रेसविषयी वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा - दूध महागले.. गाईच्या दुधात २ रुपयांची वाढ, उद्यापासून दरवाढ लागू
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना झोडून काढू अशी भूमिका घेतली होती. तीच भूमिका आता शिवसेनेने घ्यावी, शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधींचा निषेध करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आता सावरकरप्रेमींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे चिटणीस विजय कानिटकर यांनी यावेळी केली.
हेही वाचा - पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चाकणमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडले