ETV Bharat / state

तरूणाच्या खूनाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड बाजारपेठ बंद - pune crime

तरुणाचे अपहरण करून खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. या घटनेचे पडसाद आज पिंपरी बाजार पेठेत पहायला मिळाले. घटनेच्या निषेधार्थ आज बाजार पेठ बंद ठेवण्यात आली.

तरूणाच्या खूनाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड बाजारपेठेमध्ये आज बंद पाळण्यात आला
author img

By

Published : Jul 24, 2019, 7:39 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेलच्या गेटवर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाचे अपहरण करून खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. हितेश गोवर्धन मूलचंदानी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे अपहरण करून कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद आज पिंपरी बाजार पेठेत पाहायला मिळाले. घटनेच्या निषेधार्थ आज बाजार पेठ बंद ठेवण्यात आली.

तरूणाच्या खूनाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड बाजारपेठेमध्ये आज बंद पाळण्यात आला
आरोपीला लवकरात-लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. आरोपीला पकडून फाशीची शिक्षा द्या, असे फलक संतापलेल्या नागरिकांच्या हातात होते. पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी रोहित किशोर सुखेना यांनी फिर्याद दिली आहे. अमीन फिरोज खान, शाहबाज सिराज कुरेशी, आरबाज शेख, अक्षय संजय भोसले, लंगडा यांच्यावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी पहाटे अमीन खान याने हॉटलेच्या गेट जवळ लघु शंका केली. त्यावेळी कामगार साहिल लालवाणी याने इथे लघुशंका करू नका असे सांगितले, याचाच राग मनात धरून अमीनने त्याला शिवीगाळ करून कामगार कैलास पाटीलच्या डोक्यात बिअरची बाटली फोडुन जखमी केले होते. हे पाहून हॉटेलमधील आणखी कर्मचारी आणि मालक बाहेर आले. पळून जात असलेल्या आरोपींच्या पाठीमागे मयत हितेश हा धावत गेला. तेव्हा, संबंधित आरोपींनी त्याचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने आणि चाकूने सपासप वार करून खून होता. या प्रकरणी एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर चार जण फरार आहेत. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस शाखेचे निरीक्षक रंगनाथ उंडे हे करत आहेत.

Intro:mh_pun_01_murder_effect_av_10002Body:mh_pun_01_murder_effect_av_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेलच्या गेटवर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाचे अपहरण करून खून केल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. हितेश गोवर्धन मूलचंदानी असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे अपहरण करून कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्याचे पडसाद आज पिंपरी बाजार पेठेत पाहायला मिळाले, बाजार पेठ बंद ठेवण्यात आली. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. आरोपीला पकडून फाशीची शिक्षा द्या असे आशयाचे फलक संतापलेल्या नागरिकांच्या हातात होते. पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी रोहित किशोर सुखेना यांनी फिर्याद दिली आहे. अमीन फिरोज खान, शाहबाज सिराज कुरेशी, आरबाज शेख, अक्षय संजय भोसले, लंगडा यांच्यावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे अमीन खान ने हॉटलेच्या गेट जवळ लघु शंका केली. त्यावेळी कामगार साहिल ललवाणी याने इथे लघुशंका करू नका असे सांगितले याचाच राग मनात धरून अमीन ने त्याला शिवीगाळ करून कामगार कैलास पाटीलच्या डोक्यात बिअर ची बाटली फोडुन जखमी केले होते. हे पाहून हॉटेलमधील आणखी कर्मचारी आणि मालक बाहेर आले. अमीन ला पकडले तर एक जण पळून गेला. काही जणांनी चारचाकीसह धूम ठोकली. पळत गेलेल्या आरोपीच्या पाठीमागे मयत हितेश हा धावत गेला. तेव्हा, संबंधित आरोपींनी त्याचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने आणि चाकूने सपासप वार करून खून केला. या घटने प्रकरणी एक जना ला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर चार जण फरार आहेत. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे हे करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.